Police Deployment
Police DeploymentAgrowon

Ashadhi Wari 2024 : ‘आषाढी’साठी ११ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात

Wari Update : आषाढी वारीसाठी यंदा महाराष्ट्रासह परराज्यातून सुमारे १२ ते १५ लाख वारकरी दर्शनासाठी पंढरपुरात येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे.
Published on

Solapur News : आषाढी वारीसाठी यंदा महाराष्ट्रासह परराज्यातून सुमारे १२ ते १५ लाख वारकरी दर्शनासाठी पंढरपुरात येतील, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्यादृष्टीने तब्बल ११ हजार ७९९ पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या नेतृत्वाखाली चार अप्पर पोलिस अधीक्षक, २५ उपअधीक्षक आणि ३१७ अधिकारी पंढरीत दाखल झाले आहेत. ते सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत.

आषाढीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्याबाहेरून किंवा जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या १३ मार्गांवरील वाहतूक दुसऱ्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यंदा वारीसाठी दरवर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या मोठी असेल, असा सर्व जिल्ह्यांचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह परराज्यांतूनही भाविक दर्शनासाठी पंढरीत येणार आहेत.

Police Deployment
Ashadhi Wari 2024 : वेळापुरात यंदा माऊलींचा मार्ग खडतरच

त्या अनुषंगाने बाहेरील जिल्ह्यातून देखील पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. वारीमध्ये साध्या वेशातील देखील पोलिस असणार आहेत. वारकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यावर ते लक्ष ठेवतील. पोलिस मदत कक्ष देखील वारीच्या ठिकाणी असणार आहेत. वारीच्या काळात वाहने शहरात येणार नाहीत, याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जाणार आहे.

Police Deployment
Ashadhi Wari 2024 : 'रामकृष्ण हरीचा जयघोषात' संत तुकाराम महाराजांचा पहिला रिंगण सोहळा संपन्न

आषाढी वारीसाठी येणारे भाविक आणि या वारीत चंद्रभागा स्नानाला असणारे महत्त्व लक्षात घेता, उजनीतून चंद्रभागा नदीत पाणी सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे. मानाच्या पालख्यांनी आता पंढरीच्या दिशेने प्रस्थान केले आहे.

मिठाई, खाद्यपदार्थ विक्रेत्यांना सूचना

‘‘आषाढी वारीच्या अनुषंगाने रविवारपासून (ता. ७) पंढरपुरातील मिठाई, पेढे, उपवासाचे पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांसह हॉटेल्सची देखील तपासणी केली जात आहे. प्रत्येक दुकानात स्वच्छता ठेवावी, मुदतबाह्य खराब पदार्थांची विक्री करू नये, अशा सूचना त्यांना केल्या आहेत. संशयित पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्यात काही गंभीर बाबी आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे,’’ असे अन्न औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com