
Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांतील ११ लाख ५४ हजार २४८ शेतकऱ्यांचा नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाले होते. त्यांच्या ८ लाख १२ हजार ३०८.९६ हेक्टरवर झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठीची मदत मिळणार आहे. मंगळवारी (ता. १०) निघालेल्या शासन निर्णयाने ही बाब स्पष्ट झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांनी २३ सप्टेंबर २०२४ व अनुक्रमे ७, ८, १४ व १७ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी संदर्भात मदत देण्यासाठी प्रस्ताव सादर केले होते.
त्यानुसार सप्टेंबर २०२४ मध्ये जालना जिल्ह्यातील २ लाख ८२ हजार ५३८ शेतकऱ्यांचे २ लाख ५५ हजार ५१९.९५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले होते. बीड जिल्ह्यात ५ लाख ६२ हजार २१४ शेतकऱ्यांचा ३ लाख ८३ हजार २६.१८ हेक्टरवर नुकसान झाले होते. तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात २ लाख ५७ हजार ७४७ शेतकऱ्यांचा १ लाख ५६ हजार ४२९.०३ हेक्टरवर नुकसान झाले होते.
जुलै व ऑगस्टमध्ये बीड जिल्ह्यातील ५१ हजार ७३९ शेतकऱ्यांचा १७ हजार ३३१ हेक्टरवर नुकसान झाले होते. तर जुलै महिन्यात बीड जिल्ह्यातील १० शेतकऱ्यांचे २.८० हेक्टरवर नुकसान झाले होते. झालेल्या नुकसानी संदर्भात आयुक्तांनी पाठवलेल्या प्रस्तावानंतर मध्यंतरी विधानसभा निवडणुका व आचारसंहितेमुळे मदतीचा प्रश्न प्रलंबित होता.
आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी पार पडल्यानंतर शासनाने १० डिसेंबर २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयाद्वारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेती पिकाच्या नुकसानीसाठी मदत देण्याचे जाहीर केले आहे. कोणत्या तरतुदीतून ही मदत द्यायची याविषयीही शासन निर्णयात स्पष्टता देण्यात आली आहे. त्यामुळे आता नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्हा व महिनानिहाय नुकसान भरपाईची जाहीर मदत
सप्टेंबर २०२४
जालना ४१२ कोटी ३० लाख ९३ हजार
बीड ५२० कोटी ९४ लाख २६ हजार
छ.संभाजीनगर २३४ कोटी २० लाख ७० हजार
जुलै-ऑगस्ट २०२४
बीड जिल्हा २३ कोटी ५९ लाख ८१ हजार
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.