
Nanded News : नांदेड जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. ही रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. हा भरपाई शेतकऱ्यांना तत्काळ मिळावा, यासाठी ‘ॲग्रोवन’ने पाठपुरावा केला होता.
नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते तीन सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. यात खरिपातील जिरायती, बागायती व बहुवार्षिक पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्थरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आदेश दिले होते.
यानुसार जिल्ह्यात पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा फटका जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना बसला होता. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी ८१२ कोटी ३८ लाख साठ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली होती.
या मागणीनुसार शासनाने मंगळवारी (ता. १०) नांदेडला ८१२ कोटींचा निधी मंजूर केला आहे. दरम्यान, नुकसान भरपाई मिळण्याच्या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे हा निधी मिळण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लागला. हा निधी शेतकऱ्यांना तत्काळ मिळावा, यासाठी अॅग्रोवनने सतत पाठपुरावा केला होता.
...अशी मिळणार रक्कम
राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढविले आहेत. यात जिरायतीसाठी साडेआठ हजारांवरून तेरा हजार पाचशे रुपये, बागायतीसाठी १७ हजारांवरून २७ हजार तर बहुवार्षिक पिकांसाठी २२ हजार पाचशे रुपयांवरून ३६ हजार रुपये प्रतिहेक्टर करण्यात आले आहेत. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा ही दोन हेक्टरवरून तीन हेक्टर वाढविली आहे.
तालुकानिहाय प्राप्त निधी
नांदेड-२९.८५ कोटी, अर्धापूर-३२.९७ कोटी, कंधार-७१.२७ कोटी,
लोहा-८४.४० कोटी, बिलोली-५६.६४ कोटी,
देगलूर-५०.९५ कोटी, मुखेड-५५.९२ कोटी, नायगाव-५६.६४ कोटी, धर्माबाद-२७.२६ कोटी, उमरी-३२.७० कोटी, भोकर-५२.१९ कोटी, मुदखेड-२९.३५ कोटी, हदगाव-८२.२७ कोटी, हिमायतनगर-४४.६१ कोटी,
किनवट-८०.४२ कोटी, माहूर-३५.१२ कोटी.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.