Hatnoor Dam Water Stock : हतनूरसह विविध मध्यम प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा

Water Storage : खानदेशातील तापी नदीवरील भुसावळ (जि. जळगाव) नजीकच्या हतनूरसह इतर प्रकल्पांचा जलसाठा १०० टक्क्यांवर स्थिरावला आहे.
Hatnoor Dam
Hatnoor DamAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशातील तापी नदीवरील भुसावळ (जि. जळगाव) नजीकच्या हतनूरसह इतर प्रकल्पांचा जलसाठा १०० टक्क्यांवर स्थिरावला आहे. हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलसाठा नियंत्रणासाठी धरणातून विसर्ग सुरू होता. त्यातून विसर्ग बंद झाला असून, त्याचा जलसाठा १०० टक्के एवढा स्थिर आहे.

यामुळे भुसावळसह रावेर, यावल, मुक्ताईनगर, बोदवड या भागांतील पाणीटंचाई मिटली आहे. जळगाव येथील औद्योगिक वसाहत, चोपडा, रावेर व यावलमधील रब्बीला प्रकल्पातून पाणी मिळणार आहे.

तसेच सातपुडा पर्वतालगतचे रावेरातील अभोडा, मंगरूळ, सुकी, यावलमधील गारबर्डी लघू प्रकल्प, मोर, चोपड्यातील गूळ, जामनेरातातील तोंडापूर, वाघूर, धुळ्यातील शिरपूरमधील अनेर, पांझरा, नंदुरबारमधील सुसरी व दरा या प्रकल्पांतील जलसाठादेखील १०० टक्के एवढा स्थिर आहे.

Hatnoor Dam
Hatnoor Dam : यंदा प्रथमच हतनूर धरणातून तापी पात्रात विसर्ग

त्यात पाण्याची आवक सध्या नाही. सातपुडालगतच्या प्रकल्पांत मुबलक जलसाठा असल्याने या भागात रब्बी पिकांची लागवड, पेरणी जोमात असणार आहे. पाऊसमानही या भागात बरे होते. यामुळे जलसाठे किंवा विहिरींना पाणीही मुबलक राहील, असे संकेत आहेत.

Hatnoor Dam
Hatnoor Dam : जळगावकर सावधान! हतनूर धरणाचे १० दरवाजे उघडले

जामनेरातील वाघूर धरणातूनही जळगाव, भुसावळ तालुक्यात पाणी दिले जाईल. सुमारे अडीच हजार हेक्टरला लाभ होईल. धुळ्यातील अनेर धरणातून जळगाव जिल्ह्यातील चोपडा, धुळ्यात शिरपुरातील गावांत पाणी मिळणार आहे. पांझरा धरणामुळे धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा या तालुक्यांतील शेतीला लाभ होईल, असे चित्र आहे.

यंदा विसर्ग लवकर बंद

यंदा परतीचा पाऊस नसल्याने हतनूर, अनेर, सुकी या प्रकल्पांमधील पाण्याचा विसर्ग लवकर बंद झाला आहे. मागील वर्षी चाळीसगाव (जि. जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातून तब्बल ४५ दिवस पाण्याचा विसर्ग सुरू होता.

तसेच हतनूरमधूनही ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत विसर्ग झाला होता. यंदा मात्र गिरणा धरणातच जलसाठा ५७ टक्के असल्याने त्यातून विसर्गच झालेला नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com