Leopard Attack : दहा दिवसांच्या कालवडीचा बिबट्याच्या हल्ल्यात फडशा

Animal Update : वन्यपशूंची पाळीव प्राण्यांवरची हल्ल्याची शृंखला काही थांबत नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून वन्यपशू बिबट शेतकऱ्यांचे पशुधन फस्त करीत आहे.
Animal Attack
Animal AttackAgrowon

Mhasadi News : वन्यपशूंची पाळीव प्राण्यांवरची हल्ल्याची शृंखला काही थांबत नसल्याचे चित्र आहे. गेल्या आठवड्यापासून वन्यपशू बिबट शेतकऱ्यांचे पशुधन फस्त करीत आहे. गुरुवारी सकाळी सातच्या सुमारास उमराड शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या दहा दिवसांच्या कालवडीचा जीव गेला. दुधाची धार काढून शेतकरी घरी गेल्यावर पाठीमागे बिबट्याने कालवडीचा जीव घेतला आहे.

Animal Attack
Leopard Attack : वन विभागाचे अधिकारीही बिबट समस्येमुळे हतबल

देऊर रस्त्यावरील विश्वेश्वर मंदिराजवळ उमराड शिवारात दयाराम सीताराम देवरे-पाटील यांचे शेत आहे. ज्येष्ठ शेतकरी देवरे यांच्या मुलांनी औताच्या बैलासह दुभत्या जनावरांची शेतातच व्यवस्था केली आहे. गुरुवारी पहाटे श्री. देवरे यांचा मुलगा अनंत देवरे गायींचे दूध काढून घरी आल्यावर तासाभरात शेतात गेल्यावर पाठीमागे बिबट्याने कोवळ्या कालवडीचा फडशा पाडल्याचे दिसले.

Animal Attack
Animal Attack : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात खेडमध्ये १३५ जनावरांचा मृत्यू

वन विभागास माहिती दिल्यावर वनकर्मचारी पंडित खैरनार, रमेश बच्छाव, नितीन भदाणे आदींनी पंचनामा केला. धमनार, वसमार, काकाणी, राजबाईशेवाळी, चिंचखेडे, भडगाव, काळगाव आदी ठिकाणी बिबट्या आता दररोज कुठे ना कुठे तरी पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. बेफिकीर वन विभाग पिंजरा लावून बिबट्यास कधी जेरबंद करेल याविषयी ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

गावालगत बिबट्याचा वावर वाढला आहे. सांयकाळी उशिरापर्यंत शेतात राहणे अवघड झाले आहे. दिवसा बिबट्याचा हल्ला, दहशतीमुळे शेतातील पाळीव प्राण्यांचा जीव धोक्यात आला आहे. बंदोबस्तासाठी वन विभागाने गांभीर्याने घ्यावे.
अनंत देवरे, शेतकरी, म्हसदी (ता. साक्री)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com