Soybean Yellow Mosaic : सोयाबीनवर ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव

Soybean Disease : दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी शिरोळ तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. यातच अनेक ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशी नसलेल्या वाणांची लागवड करण्यात आली आहे.
Soybean Disease
Soybean DiseaseAgrowon

Kolhapur News : शिरोळ तालुक्यात सोयाबीन पिकावर ‘येलो मोझॅक’ रोगाचा प्रादुर्भाव सुरू आहे. बदलते वातावरणही याला कारणीभूत ठरत असून, तालुका कृषी विभागामार्फत अशा पिकांची पाहणी करून विमा कंपन्यांनाही सूचना देण्यात येत आहेत.

दरवर्षीच्या तुलनेत या वर्षी शिरोळ तालुक्यात सोयाबीनच्या क्षेत्रात घट झाली आहे. यातच अनेक ठिकाणी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशी नसलेल्या वाणांची लागवड करण्यात आली आहे.

अशा वाणांवर पहिल्या टप्प्यात ‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव दिसत आहे. नियमित कालावधीपेक्षा लवकर पेरणी केलेल्या सोयाबीनवर खास करून हा प्रादुर्भाव जाणवत आहे.

तालुका कृषी विभागामार्फत प्रादुर्भाव झालेल्या प्लॉटची पाहणी केली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येत आहे. विद्यापीठाने शिफारशी न केलेले वाण शेतकऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.

Soybean Disease
Yellow Mosaic On Rajma : ‘पिवळा मोझ्याक’चा राजमा पिकावर प्रादुर्भाव

शिवाय मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही पीक हाताला लागणार का असा प्रश्‍न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाला आहे. एक महिना उशिरा पावसाला सुरुवात झाली. मात्र फार काळ पाऊस न झाल्याने शिवाय कडक उन्ह, कधी ढगाळ वातावरण तर कधी पावसाच्या हलक्या सरी अशा प्रतिकूल वातावरणात सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. हे वातावरण रोगांना पोषक ठरत असल्याने फवारणीच्या खर्चातही वाढ होत आहे. बदलत्या वातावरणाचा पीकवाढीला फटका बसत आहे.

Soybean Disease
Soybean Yellow Mosaic : ‘येलो मोझॅक’मुळे तीन एकरांतील सोयाबीन प्रादुर्भावग्रस्त

तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी विहिरी, कूपनलिका, नद्यांचे स्रोत आदी उपलब्ध पाण्यावर आगाप पेरण्या आटोपत्या घेतल्या. यातच एक महिना उशिरा सुरू झालेल्या पावसाने पाणीकपातीचे संकट निर्माण झाले. शिवाय काही काळ सुरू झालेला पाऊस नंतर पूर्णपणे थांबल्याने सध्या सोयाबीनला पाण्याची गरज निर्माण झाली आहे.

पुराची स्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी नदीवरील मोटारी सुरक्षित ठिकाणी हलवल्या. त्यामुळे आता वेळेत पाणीही मिळू शकत नाही. सर्वच बाजूंनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. सोयाबीन पिकावर येलो मोझॅकचा मोठ्या प्रादुर्भाव दिसत आहे. याच बरोबरीने पिकांवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठी समस्या निर्माण झाली आहे.

‘येलो मोझॅक’चा प्रादुर्भाव झालेल्या क्षेत्राची पाहणी केली जात आहे. याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही केले जात आहे. याशिवाय विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना देखील याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने शिफारशी केलेल्या वाणांचा वापर करणे आवश्यक आहे.
-चंद्रकांत जांगळे-पाटील, तालुका कृषी अधिकारी, शिरोळ

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com