Krushik Exhibition : बारामतीत जगातील पहिले ‘फार्म ऑफ फ्यूचर’ साकारणार

मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचा पुढाकार
Krushik Exhibition
Krushik ExhibitionAgrowon

बारामती ः तंत्रज्ञानाच्या मदतीने कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शाश्‍वत शेती कशी असते हे पाहण्यासाठी जगातले पहिले फार्म ऑफ फ्यूचर (भविष्यातील अत्याधुनिक शेती) (Farm Of Future) केंद्र बारामतीत सुरू करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा (Dr. Ranvir Chandra) यांनी बारामतीत केली.

Krushik Exhibition
Krushik Exhibition : बारामतीत सुरू होतेय नवीन ‘कृषिपर्व’

मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड विद्यापीठ व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने सेंटर ऑफ एक्स्लेन्स ऑन फार्मव्हाइब्ज या प्रकल्पाचा प्रारंभ मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी संचालक रणवीर चंद्रा, ऑक्सफर्डचे संचालक डॉ.

अजित जावकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, संस्थेचे विश्‍वस्त प्रतापराव पवार, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विश्‍वस्त सुनंदा पवार, सुनेत्रा पवार, प्रतिभाताई पवार, रजनी इंदुलकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला, त्या प्रसंगी चंद्रा यांनी ही घोषणा केली.

Krushik Exhibition
मांघर गावात साकारणार ‘मधाचे गाव’ संकल्पना

बारामतीत सुरू होणारे केंद्र हे वॉशिंग्टन नंतर जगातील केवळ दुसरे संशोधन केंद्र ठरणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील कृषी क्षेत्रासाठी हा पथदर्शी प्रकल्प म्हणून नोंदला जाईल.

उपग्रह, ड्रोन, रोबोट यांच्यासह तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून अत्याधुनिक शेतीचे प्लॉट बारामतीत विकसित केले जाणार असून, केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील भविष्याचा वेध घेणारी शेती मायक्रोसॉफ्ट, ऑक्सफर्ड व ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट विकसित करणार असल्याचे चंद्रा यांनी नमूद केले.

अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दृष्टीने कमी खर्चात अधिक फायदा देणारी शेती हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून यात काम होणार आहे.

आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या मदतीने परिपूर्ण शेतीसाठी प्रत्यक्ष काम करण्यासह संशोधन व शेतकऱ्यांच्या ज्ञानाचाही यात उपयोग करून घेतला जाणार असल्याचे चंद्रा यांनी स्पष्ट केले.

Krushik Exhibition
Krushik Exhibition : कृषिक प्रदर्शनचा १९ पासून बारामतीत प्रारंभ

शेतीत येणाऱ्या नुकसानीचे मूळ कारण शोधण्यासह संकटाचा अंदाज अगोदर देऊन नुकसानीची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे डॉ. अजित जावकर यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामती हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापरामुळे बारामती हे आधुनिक शिक्षणाचे केंद्र म्हणून जगभरात ओळखले जाईल, याचा आनंद व्यक्त केला. मायक्रोसॉफ्ट शेतीबाबत थेट अमेरिकेतून बाहेर पडून बारामतीत आले आहे, याचा फायदा या परिसरातील शेतकऱ्यांना नक्की होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

‘आयबीएम’ने विद्या प्रतिष्ठानसोबत सामंजस्य करार केला असून, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरीची संधी ते देऊ करणार आहेत, शिक्षण शुल्कासाठीही ते मदत करणार आहेत.

एकीकडे आयबीएमच्या माध्यमातून शिक्षण व नोकरीची संधी युवकांना मिळेल तर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या मदतीने मायक्रोसॉफ्ट ऑक्स्फर्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व संशोधन मिळणार असून फायदेशीर शेती होण्यासाठी मदत होणार आहे.

शेती व संशोधनासह कुशल मनुष्यबळ तयार करणारे एक केंद्र म्हणून बारामतीची ओळख होईल, असेही शरद पवार म्हणाले.

प्रतापराव पवार यांनी ऑक्सफर्ड व मायक्रोसॉफ्टच्या मदतीने आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करून उत्तम शेती करता येईल, चीन व अमेरिकेच्या धर्तीवरच भारतात व बारामतीत हे काम सुरू होते आहे याचे समाधान व्यक्त केले.

राजेंद्र पवार यांनी प्रास्ताविकात आढावा घेतला. सुप्रिया सुळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com