Krushik Exhibition : बारामतीत सुरू होतेय नवीन ‘कृषिपर्व’

‘कृषिक’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनामध्ये मायक्रोसॉफ्ट मार्फत बारामती येथे उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज’ या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिके शेतकरी, उद्योजकांना पाहायला मिळतील.
Krushik Exhibition : बारामतीत सुरू होतेय नवीन ‘कृषिपर्व’

बारामती ः कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शाश्वत शेती (Sustainable Agriculture) करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाची (Agriculture Technology) जोड देत, शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जगप्रसिद्ध संगणक प्रणाली विकसित करणारी मायक्रोसॉफ्ट कंपनी (Microsoft), जगातील सर्वोत्तम समजल्या जाणाऱ्या विद्यापीठांपैकी एक ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि बारामतीची आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कृषीविषयक संस्था ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे (Agriculture Development Trust) अटल इनक्युबेशन सेंटर, कृषी विज्ञान केंद्र एकत्रितपणे प्रयत्न करणार आहेत.

Krushik Exhibition : बारामतीत सुरू होतेय नवीन ‘कृषिपर्व’
Krushik Exhibition : कृषिक प्रदर्शनचा १९ पासून बारामतीत प्रारंभ

मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणवीर चंद्रा, ऑक्सफर्डचे संचालक डॉ. अजित जावकर, ज्येष्ठ नेते शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, आमदार रोहित पवार, विश्वस्त सुनंदा पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी (ता. ३) या उपक्रमाचा प्रारंभ होत आहे. याचबरोबर ‘कृषिक २०२३’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटनही या प्रसंगी होणार आहे.

‘कृषिक’ या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनामध्ये मायक्रोसॉफ्ट मार्फत बारामती येथे उभारण्यात येणाऱ्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स ऑन फार्मव्हाइब्ज’ या कृषी संशोधन प्रकल्पातील अनेक प्रात्यक्षिके शेतकरी, उद्योजकांना पाहायला मिळतील. या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनामध्ये १७० एकरांवर बी-बियाणे, खते, कीड व रोग नियंत्रण या आधारित अत्याधुनिक तंत्रज्ञानावर प्रात्यक्षिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

Krushik Exhibition : बारामतीत सुरू होतेय नवीन ‘कृषिपर्व’
Krushik Exhibition 2023 : ऑक्सफर्ड’ची ज्ञानगंगा मऱ्हाटी अंगणी

शेतकऱ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स, व्हर्टिकल फार्मिंग, अर्बन फार्मिंग, रोबोटचा शेतीतील वापर, दुग्ध व फळप्रक्रिया क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान, बदलत्या हवामानाला तोंड देण्यासाठी उपाययोजना, दूध व भाजीपाला प्रक्रिया उद्योग, मिलेट दालन, नैसर्गिक शेती अशा नवीन बाबी या प्रदर्शनात पाहायला मिळतील.

शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन १९ ते २२ जानेवारी दरम्यान खुले असेल. ३ ते १८ जानेवारी दरम्यान स्टार्टअप इतर नवसंशोधक असतील त्यांच्यासाठी वेबिनारचे आयोजन केलेले आहे. वरील सर्व विषयांच्या प्रशिक्षणाचा लाभही शेतकऱ्यांना भविष्यात घेता येईल.

Krushik Exhibition : बारामतीत सुरू होतेय नवीन ‘कृषिपर्व’
Agriculture Development : शेतीच्या विकासासाठी अधिक काम व्हावे

भविष्यातील धोक्यांचा घेता येणार वेध

- बिल गेट्स यांच्या संकल्पनेतून मायकोसॉफ्ट कंपनीने बारामतीत कृषी क्षेत्रावर आधारित संशोधन प्रकल्प विकसित करण्याचे पाऊल उचलले आहे. प्रोजेक्ट Farmvibes.ai हा मायक्रोसॉफ्ट रिसर्च मधील शेती केंद्रित तंत्रज्ञानाचा एक नवीन संच आहे.

- मायकोसॉफ्टने अलिकडेच ही साधने सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. जेणेकरून संशोधन, डेटा शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी यांना कृषी क्षेत्रातील माहितीमध्ये बदल व सुधारणा करण्यासाठी सक्षम केले जाऊ शकते.

- या प्रकल्पातील मशिन लर्निंग अल्गोरिदम तंत्राव्दारे जमिनीची सुपीकता वाढवणे, उत्पादन वाढ करणे, पीक पद्धती नियोजन करणे, पिकांचे आरोग्य उत्तम राखणे, गुणवत्ता वाढ करणे आणि त्या मागील खर्च कमी करण्यास मदत होऊ शकते.

- Microsoft Azure या प्लॅटफॉर्मवर चालणारे Farmvibes.ai अल्गोरिदम, जमिनीतील सेन्सर्स, आकाशातील ड्रोन आणि अवकाशातील उपग्रह यांच्यामार्फत माहिती गोळा करून ‘भविष्यातील अत्याधुनिक शेती’ तयार करण्यासाठी जगभरातील विविध घटकाला सक्षम करू शकतात.

- या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकरी त्याच्या शेतात योग्य प्रमाणात खत पाणी व्यवस्थापन आणि तणनाशक वापरू शकतो आणि त्याच्या शेतातील तापमान आणि वा-याच्या वेगाचा व पावसाचा अंदाज लावू शकतो.

- याव्दारे त्याच्या शेतीचे उत्पादन वाढवू शकतो. विशेषतः Farmvibes.ai मधील नावीन्यपूर्ण संशोधनासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. त्यातील काही प्रात्यक्षिके ३ जानेवारीला दाखविण्यात येतील.

बदलते हवामान, शेतीसाठी वाढलेला खर्च, अत्यल्प उत्पन्नामुळे न परवडणारी शेती... अशा कारणांनी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी शेती करणे ही आता शेतकऱ्यांची गरज आहे. शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेती अधिक किफायतशीर होईल, यात शंका नाही. लहरी हवामानाचा फटका बसू नये व तंत्रज्ञानाच्या मदतीने संकटाची अगोदर माहिती मिळून त्यावर प्रभावी उपाययोजना करणे, उपग्रहाच्या माध्यमातून माहितीचे संकलन, ड्रोन किंवा रोबोट सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक विकसित करणे ही काळाची गरज आहे. भारतात मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्डच्या मदतीने ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, संस्थेचे विश्वस्त प्रतापराव पवार, संस्थेचे प्रमुख राजेंद्र पवार, ऑक्सफर्डचे डॉ. अजित जावकर व मायक्रोसॉफ्टचे रणवीर चंद्रा यांचे यात मोलाचे योगदान आहे. बारामतीत सुरू होणारे केंद्र हे वॉशिंग्टन नंतर जगातील केवळ दुसरे संशोधन केंद्र ठरणार आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशातील कृषी क्षेत्रासाठी हा पथदर्शी प्रकल्प म्हणून नोंदवला जाईल.

- नीलेश नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी, अँग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com