Old Pension Scheme : कृषी, महसूल, ग्रामविकास विभागाचे कामकाज ठप्प

State Employee Strike: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी.
Old Pension Scheme State Employee Strike
Old Pension Scheme State Employee StrikeAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मंगळवार (ता. १४)पासून पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात परभणी जिल्ह्यातील कृषी (Agriculture Department), महसूल, ग्रामविकास (Rural Development Department) यासह विविध विभागांचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाले आहे.

Old Pension Scheme State Employee Strike
Old Kolhapur : जुनं कोल्हापूर तुम्ही पाहिलं का?

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेतर्फे १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे. रिक्त पदे भरावीत. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या बिनशर्त कराव्यात.

Old Pension Scheme State Employee Strike
Old Pension Scheme : सरकारी कर्मचारी संपामुळे कृषीसह संलग्न सेवा ठप्प

आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची कार्यवाही सुरू करावी आदी मागण्यांसाठी मंगळवार (ता.१४)पासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी संबंधित कार्यालयासमोर आंदोलन केले.

संपामुळे कार्यालयीन कामकाज ठप्प झाल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून कामकाज करत या संपाला पाठिंबा दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com