Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात महिला जागीच ठार

पूजा जालिंदर जाधव (वय २२, रा. टाकेवाडी, कळंब, ता. आंबेगाव) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.
 leopard attacks in Nashik News
leopard attacks in Nashik NewsAgrowon
Published on
Updated on

शिरूर, जि. पुणे ः तालुक्यातील पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात (Leopard Attack) महिला ठार (Women Died In Leopard Attack) झाल्याची घटना बुधवारी (ता. १) रात्री घडली. या घटनेनंतर परिसरात पाच पिंजरे लावण्यात आले आहेत.

पूजा जालिंदर जाधव (वय २२, रा. टाकेवाडी, कळंब, ता. आंबेगाव) असे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे.

या घटनेनंतर, शिरूरचे वनपरीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर; तसेच सहायक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर व पोलिस उपनिरीक्षक सुनील उगले यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात तातडीने पाच पिंजरे लावण्यात आले असल्याची माहिती म्हसेकर यांनी दिली.

मृत पूजा जाधव या आपले पती जालिंदर जाधव व दीर विश्वास जाधव यांच्यासह फाकटे (ता. शिरूर) येथून कळंब येथे जात असताना बोंबेमळा परिसरातील कुऱ्हाडे वस्तीजवळ लघूशंकेसाठी थांबले असताना उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने पूजा यांच्यावर हल्ला करून, त्यांना फरफटत उसाच्या शेतात नेले.

पूजा यांनी आरडाओरडा केल्यावर कुऱ्हाडे वस्ती व परिसरातील काही तरुण त्यांच्या मदतीला धावले असता बिबट्याने धूम ठोकली.

त्यावेळी पूजा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांच्या मानेचे, हाताचे बिबट्याने लचके तोडले होते. या हल्ल्यात त्या जागीच गतप्राण झाल्या.

 leopard attacks in Nashik News
Grape Bat Attack : रंगीत वाणांच्या द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या झुंडीचा हल्ला
मृत पूजा जाधव यांच्यावरील बिबट्याच्या हल्ल्यानंतर, बिबट्याला पकडण्यासाठी पिंपरखेड परिसरात तातडीने पाच पिंजरे लावले असून, आवश्यकता भासल्यास आणखीही पिंजरे लावण्यात येतील. जाधव यांच्या कुटुंबीयांना वनखात्याकडून वीस लाख रुपयांची तातडीची देण्यात येणार आहे.
मनोहर म्हसेकर, वनपरीक्षेत्र अधिकारी, शिरूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com