
Turmeric Cluster हिंगोली : ‘‘जिल्ह्यात हळद उत्पादन (Turmeric Production) मोठ्या प्रमाणात होते. या भागात रस्त्यालगत शासकीय जागा उपलब्ध करून दिल्यास हळद क्लस्टरसाठी १०० एकरांवर लॉजिस्टिक पार्क (Logistic Park) उभारण्यात येईल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.
हिंगोली येथील रामलीला मैदानावर शनिवारी (ता.२५) वाशीम-पांगरे चौपदरी मार्गाचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. या वेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, भावना गवळी, आमदार वसंत खंडेलवाल, विप्लव बजोरिया, तानाजी मुटकुळे, लखन मलिक, संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, हळदीपासून विविध उत्पादने निर्माण करावीत. जालना येथील ड्राय पोर्टद्वारे हळद साता समुद्रापार जाईल. शेतकरी समृध्द होईल.
शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. या भागातला शेतकरी समृध्द झाला पाहिजे. स्मार्ट शहरे नाही तर स्मार्ट गावे झाली पाहिजेत.
तरुणांसाठी स्थानिक परिसरात रोजगार मिळाला पाहिजे. या भागाचा विकास दर वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत. जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य द्यावे.
इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिजेल, बायोसीएनजी इलेक्ट्रिक, हायड्रोजन यासारखे प्रकल्प उभारल्यास या भागातील शेतकरी समृध्द होतील.’’
‘हिंगोलीतील महामार्गावर सहा कामे पूर्ण’
‘‘मागील आठ वर्षात हिंगोली जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गावर एकूण १३ कामे मंजूर करण्यात आली आहेत. त्यांची किंमत ५ हजार ५८७ कोटी रुपये आहे. यापैकी ६ कामे पूर्ण झाली आहेत. सात कामे प्रगतिपथावर आहेत,’’ असेही गडकरी म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.