Turmeric Market : हंगामाच्या सुरुवातीलाच हळदीचा रंग बेरंग

यंदा हळद लागवडीपासून ते काढणीपर्यंत हळदीला पोषक असे वातावरण होते. पिकावर कोणत्याही रोगाचा, किडीचा प्रादुर्भाव झाला नाही.
Turmeric Market
Turmeric MarketAgrowon

Sangli News : वेळ सकाळी अकराची... सांगली जिल्ह्यासह सातारा जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी (Turmeric Producer Farmer) सांगली बाजार समितीत हळद विक्रीला घेऊन आले होते.

सौदे सुरू झाले अन् हळदीचे दर (Halad Rate) ऐकताच गेल्या वर्षीच्या तुलनेत हंगामाच्या सुरुवातीलाच हळदीच्या दरात (Turmeric Rate) प्रति क्विंटलला ७०० ते ८०० रुपयांची पडझड सुरू झाली आहे, असा सूर हळद उत्पादकांचा होता.

त्यामुळे हळद विकायची की ठेवायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे हळद उत्पादकांच्या चेहऱ्यावरचा रंगच बेरंग झाला आहे.

यंदा हळद लागवडीपासून ते काढणीपर्यंत हळदीला पोषक असे वातावरण होते. पिकावर कोणत्याही रोगाचा, किडीचा प्रादुर्भाव झाला नाही. त्यामुळे दर्जेदार हळदीचे उत्पादन हाती लागले आहे. यंदाच्या हंगामातील हळद काढणी सुरू झाली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बाजार समितीत नवीन हळद विक्रीस येऊ लागली आहे.

सांगली जिल्ह्यासह सातारा, कर्नाटक राज्यातील शेतकरी हळद शेतातून थेट विक्रीसाठी बाजार समितीत दाखल होत आहेत. दररोज सुमारे ११ ते १२ हजार पोती (एक पोते ५० किलोचे) सौद्यासाठी येत आहेत.

Turmeric Market
Turmeric crop : शेतकरी नियोजन पीक : हळद

मंगळवारी (ता. १४) सकाळी शेतकरी हळद घेऊन बाजार समितीत दाखल झाले. सौदे सुरू झाले. शेतकरी प्रत्येक सौद्याच्या ठिकाणी जाऊन हळदीच्या दराचा अंदाज घेत होते. हळदीचे दर ऐकताच कष्टाने पिकविलेल्या हळदीला चांगले दर कसे मिळणार, अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होती.

गेल्या दोन वर्षांत हळदीला चांगले दर मिळाले. परंतु यंदा त्या तुलनेत सुरुवातीलाच दरात प्रतिक्विंटलला ७०० ते ८०० रुपयांची पडझड झाली आहे. दर्जेदार हळद पिकविली आहे. केलेला खर्च कसा मिळणार, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

मागणी, पुरवठा विस्कळीत

गतवर्षीची हळद अजूनही विक्रीविना शिल्लक आहे. त्यात या वर्षीच्या आवकेमुळे त्यामुळे मागणी आणि पुरवठा याचे गणित विस्कळीत होत आहे. याचा परिणाम हळदीच्या दरावर झाला आहे. यामुळे हळदीचे दर कमी झाले असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

प्रतवारीनुसार हळदीचे दर (प्रतिक्विंटल)

पावडर क्वालिटी...६५०० ते ७००

वायदा चलन...७१०० ते ७५००

लगडी...९००० ते १४०००

कणी...६००० ते ६६००

गट्टी ..६००० ते ८५००

गेल्या तीन वर्षांपासून हळद पीक घेतोय. प्रत्येक वर्षी हळदीला चांगले दर मिळाले आहेत. मात्र यंदा प्रारंभीच हळदीचे दर कमी आहेत. सौद्यातील दर ऐकताच हळद विकायची की ठेवायची असा प्रश्‍न पडला आहे.
विश्‍वास पवार, हळद उत्पादक, वडोली निळेश्‍वर, ता. कऱ्हाड, जि. सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com