Weather Update : हवामानाच्या अचूक अंदाजासाठी‘केंद्रा’कडे पाठपुरावा करणार : शेट्टी

Raju Shetti : हवामान अंदाजासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यासाठी श्री. शेट्टी यांनी विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांची नुकतीच भेट घेतली.
Raju Shetti
Raju ShettiAgrowon
Published on
Updated on

Pune News : ‘‘हवामान अंदाजातील तफावतीमुळे शेती क्षेत्राचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अचूक हवामानाच्या अंदाजासाठी तंत्रज्ञान विकसित करून हवामान निरीक्षणाचे जाळे वाढवावे लागेल. याकरिता केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार आहे,’’ असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी येथे व्यक्त केले.

हवामान अंदाजासंदर्भातील विषयांवर चर्चा करण्यासाठी श्री. शेट्टी यांनी विभागाचे अतिरिक्त महासंचालक डॉ. के. एस. होसाळीकर यांची नुकतीच भेट घेतली. या प्रसंगी दुष्काळ कसा घोषित केला जातो, तो जाहीर करताना पर्जन्यमान आणि त्याचा कालावधी कसा असतो, त्याचे निकष काय असतात, इतर देशांप्रमाणे आपल्याकडे हवामानाची माहिती अचूक का दिली जात नाही, जागतिक तापमानवाढीच्या स्थितीत हवामान विभाग कशा पद्धतीने काम करत आहे, हवामान विभागाची अचूक माहिती मिळण्यासाठी कोणते तंत्रज्ञान विकसित करावे लागेल, शेतीबरोबर आरोग्यासाठी हवामान विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका काय, आदी विषयांवर या प्रसंगी चर्चा करण्यात आली.

Raju Shetti
Maharashtra Rain: उद्यापासून पावसाचा जोर कमी होणार; राज्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

‘‘भारतीय शेतीच्या व शेतकऱ्यांच्या दृष्टीने हवामान खात्याची भूमिका ही महत्त्वाची आहे. मात्र केंद्र सरकार याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. हवामानाचे अचूक अंदाज नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,’’ असे मत श्री. शेट्टी यांनी नोंदविले.

Raju Shetti
Khandesh Rain Update : खानदेशात हलका ते मध्यम पाऊस

डॉ. होसाळीकर म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना हवामानाची अद्ययावत माहिती मिळण्यासाठी तालुक्यातील मंडलनिहाय पर्जन्य मापक केंद्रे असणे गरजेचे आहे. गेल्या १५० वर्षांच्या हवामानाची माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे.

इतर देशांप्रमाणे आपल्या देशात हवामानाचा अंदाज अचूक न येण्यामागे त्या विषुववृत्तीय देशाची भौगोलिक रचना कारणीभूत आहे. यामुळे त्यांचा अंदाज अचूक असल्याचे सांगितले. या वेळी सावकर मादनाईक, योगेश पांडे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

‘ब्रिटिशकालीन पद्धत बदलणे गरजेचे’

‘‘सरासरी पावसाचे निकष हे जिल्हावार न काढता मंडलस्तरावर काढणे गरजेचे आहे. (उदा. महाबळेश्वरमध्ये पडणाऱ्या पावसामुळे सातारा जिल्ह्यातील सरासरी जास्त येते, मात्र त्याचा फटका खटाव-माण मधील दुष्काळप्रवण क्षेत्रातील शेतकऱ्यांना बसतो.

परिणामी पीकविमा कंपन्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास नकार देतात.) दुष्काळ घोषित करण्याची राज्य व केंद्र शासनाची ब्रिटिशकालीन पद्धत बदलणे जरुरी आहे,’’ असे मत श्री. शेट्टी यांनी व्यक्त केले. तसेच या बाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com