Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती असलेला फास कृषीमंत्री धनंजय मुंडे सोडवणार का?

Beed Farmers : सध्या राज्यात पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट उभा राहिले आहे. अशातच कृषी खाते धनंजय मुंडे यांच्याकडे गेल्याने त्यांना नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल.
Dhananjay  Munde
Dhananjay Mundeagrowon
Published on
Updated on

Agriculture Minister Dhananjay Munde : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड करत युती सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेत ९ जणांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करण्यात आला. यामध्ये राज्याच्या दृष्टीने महत्वाचे खाते मानले जाणाऱ्या कृषी खाते अब्दुल सत्तार यांच्याकडून काढून घेत धनंजय मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे.

दरम्यान बीड जिल्हा आणि मराठावड्याला कृषी मंत्रीपद मिळाल्याने कायम दुष्काळाने होरपळलेल्या भागाला न्याय मिळणार का? याबाबत चर्चा होत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाच्या संकटात शेतकरी अडकलेला असल्याने राज्यात सर्वाधिक आत्महत्यांची नोंद बीड जिल्ह्यात होत आहे.

याच जिल्ह्याचे धनंजय मुंडे यांना आता शेतकऱ्यांशी निगडित कृषी खाते मिळाल्याने त्यांना मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी काम करण्याची मोठी संधी धावून आली आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्यासाठी त्यांनी सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचीही गरज आहे.

मागच्या कित्येक वर्षांपासून धनंजय मुंडे यांना राजकारणात सक्रीय असल्याने त्यांची प्रशासकीय यंत्रणेवर वचक निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांना मिळालेल्या कृषी खात्याच्या माध्यमातून काम करत त्यांना मराठवाड्याचे नेते म्हणून ओळख निर्माण करण्याची मोठी संधी आहे.

Dhananjay  Munde
Dhananjay Munde On Onion : कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुंडे झाले आक्रमक | ॲग्रोवन

आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्याचे आव्हान

बीड जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या होत असल्याने मुंडेंसमोर त्यांचा खरा कस आता लागणार आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार बीड जिल्ह्यात दीड दिवसाला एक शेतकरी आत्महत्या होते. तर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अशीच परिस्थिती आहे. 

यानंतर आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळते अन् यावर पांघरून घातले जाते. यावर उपाययोजनांसह शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कायम आराखडा तयार करून तो शासनाकडून मंजूर होण्याइतपत धनंजय मुंडे यांनी राजकीय वजन वापरण्याची गरज आहे.

Dhananjay  Munde
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंना आता सूचलं का? शेतकरी संकटात असल्याने वाढदिवस करणार नसल्याचा घेतला निर्णय

बोगस बियाणे विकणाऱ्यावर कारवाई होणार का?

दरम्यान राज्यात सध्या पावसाचे प्रमाण कमी झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरण्यांचे संकट ओढावण्याची शक्यता आहे. तसेच बोगस बियाणे, खतांच्या वाणांची साठेबाजी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणारी कृषी सेवा केंद्रांसह शेतकऱ्यांना लुबाडणारी व्यापाऱ्यांटी टोळी उभारली आहे ती मोडीत काढण्याचे आव्हान मुंडे यांना पेलण्याची गरज आहे.

शेतकरी अपघात विमा योजना रुळावर येणार का?

गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी असलेल्या अपघात विमा योजनेस अनेकदा कंपनीच मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विम्याचे प्रस्ताव महिनोनमहिने धूळ खात असतात. 'आत्मा' हा शेतकऱ्यांसाठी असलेला महत्त्वाचा विभाग ठराविक घटकांसाठीच काम करत असल्याचे अलीकडे दिसते. त्यांच्या बीड जिल्ह्यात कृषी विभाग रिक्त पदांनी पंगू झालेला आहे तर 'आत्मा' भरकटलेला आहे. त्याला रुळावर आणण्यासाठीही प्रयत्नांची गरज आहे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com