Crop Damage : खानदेशात मका, केळी पिकांत वन्यप्राण्यांचा उपद्रव

खानदेशात तापी, गिरणा, अनेर नदीच्या लाभक्षेत्रात रानडुकरे, रानगवे, हरणांचा उपद्रव सुरू आहे. वन्यप्राणी पिके फस्त करीत असून, शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस पीक संरक्षण किंवा राखणदारीसाठी शेतात मुक्काम करावा लागत आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

जळगाव ः खानदेशात तापी, गिरणा, अनेर नदीच्या लाभक्षेत्रात रानडुकरे, रानगवे, हरणांचा उपद्रव (Wildlife Rampage) सुरू आहे. वन्यप्राणी पिके फस्त करीत असून, शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस पीक संरक्षण (Crop Protection) किंवा राखणदारीसाठी शेतात मुक्काम करावा लागत आहे.

Crop Damage
Tur Crop Damage : जळकोट तालुक्यात तुरीचे पीक वाळले

मध्यरात्री किंवा पहाटेच्या वेळी हे वन्यप्राणी पिकांत येऊन नासधूस करतात. यामुळे केळी, मका आदी पिकांचे मोठे नुकसान जळगाव, चोपडा, एरंडोल, यावल, रावेर, मुक्ताईनगर, भडगाव, पाचोरा, जामनेर, बोदवड आदी भागांत होत आहे. काही गावानजीक वनक्षेत्र आहे. या क्षेत्रातून वन्यप्राणी थेट नजीकच्या शिवारात येतात. त्यातील पिके फस्त करतात.

काही शेतकरी वन्यप्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतात विविध कर्कश आवाज करणारी यंत्रणा बसवीत आहेत. त्यासाठी खर्चही येत आहे. काही शेतकरी रात्री मुक्काम करून पिकांचे संरक्षण करीत आहेत. लागवड केलेल्या मका बियाण्यावरही रानडुकरे हल्ला करीत आहेत. तसेच निसवलेल्या केळी बागा, वाढीच्या अवस्थेतील बागांतही धुमाकूळ करीत आहेत.

Crop Damage
Wildlife Attack : प्राण्यांच्या उपद्रवाचा फळ लागवडीला फटका

यावल, जळगाव येथील अभयारण्याशी संबंधित वन विभागाने याबाबत गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची गरज आहे. परंतु वन विभाग गावांत जातच नाही. नुकसान होते. शेतकरी तक्रारी करतात व नुकसान सहन करतात, वन विभाग बघ्याची भूमिका पार पाडतो व वन्यप्राणी कायदा पाळा, असे सांगून नामानिराळा होतो. पण नुकसानीची जबाबदारीदेखील वन विभागाने घेतली पाहिजे, असा मुद्दाही शेतकरी उपस्थित करीत आहेत.

शेतकऱ्यांचे १० ते १५ टक्के पिकांचे नुकसान सुरुवातीलाच वन्य प्राणी करीत आहेत. तसेच नैसर्गिक आपत्ती व इतर समस्यादेखील आ वासून उभ्या आहेत. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. पिकांची लागवड, उत्पादन घेण्यासंबंधीचा उत्पादन खर्च वाढला आहे. त्यात इतर संकटे असल्याने नुकसान वाढून खर्चही काढणे अशक्य होते. यामुळे वन विभागाने भरपाईची तरतूद करावी. रानडुकरे, रानगवे, हरणे यांचा अटकाव करण्यासाठी शेतकऱ्यांना आवश्यक यंत्रणा, सामग्री मोफत पुरवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आमच्या भागात मका, केळी आदी पिके आहेत. त्यात बारमाही वन्यप्राण्यांचा उपद्रव सुरू असतो. नुकसान वाढतच जाते. शेतकरी तक्रार करतात. परंतु त्याची दखल कुणी घेत नाही. हे नुकसान अधिक असते, त्याबाबत भरपाईसाठी वन विभागाने तरतूद करावी. रानडुकरे, रानगवे गावोगावी आहेत. त्यांचा बंदोबस्त करावा किंवा त्यासाठी वन विभागाने शेतकऱ्यांना ठोस मदत करावी. - पवन पाटील, शेतकरी, दापोरी, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com