Rain Update : बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सर्वदूर पाऊस

Latest Rain News : गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Akola News : गेल्या महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना बऱ्यापैकी दिलासा मिळाला आहे. प्रामुख्याने बुलडाणा, वाशीम जिल्ह्यांत सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात चांगला पाऊस झाला. तर अकोला जिल्ह्यातही काही भागांत पावसाने हजेरी दिली.

या भागात साधारणपणे महिनाभरापासूनच पावसाचा खंड तयार झालेला आहे. कोरडवाहू क्षेत्र सर्वाधिक असल्याने आणि त्यातही सोयाबीनचे पीक फुलोरा, शेंगा अवस्थेत असल्यामुळे पावसाची गरज निर्माण झाली होती. काही ठिकाणी सोयाबीन उत्पादनाला मोठा फटका बसलेला आहे. कोरडवाहू पट्ट्यातील कपाशीच्या पिकाला हा पाऊस अधिकच फायदेशीर आहे.

Rain Update
Rain Update : अखेर पावसाचं 'कमबॅक', आज कुठे कुठे पडला पाऊस

गेल्या २४ तासांत बुलडाणा जिल्ह्यात सर्वदूर पावसाची नोंद झाली. त्यातही जळगाव जामोद, संग्रामपूर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगावराजा या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक होता. वाशीम जिल्ह्यातही सर्वत्र पाऊस असून, रिसोड तालुक्यात अधिक प्रमाणात कोसळला. तुलनेने अकोला जिल्ह्यात तेल्हारा, मूर्तिजापूर या दोन तालुक्यांशिवाय इतरत्र त्रोटक स्वरूपाचा पाऊस नोंद झालेला आहे. शुक्रवारी (ता. ८) दिवसभर ढगाळ वातावरण तयार झालेले होते. काही ठिकाणी पाऊसही झाला.

Rain Update
Maharashtra Rain Update : सर्वदूर पावसाने पिकांना संजीवनी

मंडलनिहाय पाऊस

बुलडाणा जिल्हा ः जळगाव ४८.८ मिलिमीटर, जामोद ११.५, पिंपळगाव काळे २७.३, वडशिंगी १३.३, आसलगाव २७.८, संग्रामपूर १४.३, सोनाळा ६.३, बावनबीर ६.३, पातुर्डा १४.८, कवठळ १६, चिखली ७.५, एकलारा ९.५, कोलारा ११.५, मेरा खुर्द ११.८, शेलगाव आटोळ ३२, चांदई ८.८, बुलडाणा ७.५,

रायपूर ९.५, धाड ११.५, पाडळी २०, म्हसला १९, साखळी बुद्रुक १६, देऊळघाट २०, देऊळगावराजा शहर ३३, देऊळगावराजा ग्रामीण ४२.८, तुळजापूर ४८.८, मेहूणाराजा ३९, अंढेरा १९.५, मेहकर १५.३, जानेफळ १९.५, हिवरा आश्रम १७.८, शेलगाव देशमुख ३२, डोणगाव २६.५, देऊळगाव माळी २०, वरवंड २८.८, लोणी ७.५, अंजनी बुद्रुक १४.८,

नायगाव दत्तापूर १५.३, कल्याणा २४. ३, सिंदखेडराजा ५६, किनगावराजा ३३, मलकापूर पांगरा १४.८, दुसरबीड ३३.३, सोनोशी ३९, शेंदुर्जन २०.८, साखरखेर्डा १७.८, लोणार ५०, बिबी १४.८, सुलतानपूर २९.५,

टिटवी ४७.८, हिरडव ६३.५, अंजनी खुर्द २१.५, काळेगाव १०, शेगाव ४७, माटरगाव २८.५, जलंब २४.८, जवळा बुद्रुक २०.८, मनसगाव १८.८, मलकापूर १०.५, दाताळा १८.५, नरवेल १४.३, धरणगाव १३.८, जांभूळधाबा १३.३, मोताळा १६.८, बोराखेडी १४.५, पिंपरी गवळी २१.८, रोहिणखेड ११.८, पिंपळगाव देवी १३.८, शेलापूरबुद्रुक १०.५, एकूण जिल्हा १८.४ मिलिमीटर

अकोला जिल्हा ः मुंडगाव २२, पणज ११, तेल्हारा १६.३, हिवरखेड २५.८, पाथर्डी १७.५, निंबा १५, मूर्तिजापूर १८.५, हदगाव १५.८.

वाशीम जिल्हा ः वाशीम १२.३, पार्डी टकमोर १०.३, अनसिंग २९, राजगाव ९.३, नागठाणा २२.५, वारला २१.३, केकतउमरा ११.८, कोंढाळा झांबरे १६.३, पार्डी आसारे १९.३, रिसोड २४.३, भर जहाँगीर २०, मोप २०, वाकद २५.५, केनवड ३३, गोवर्धन २४.८, रिठद २४.५, कवठा खुर्द २६.३, मालेगाव १८, शिरपूर १४.८, किन्हीराजा १२.८, मुंगळा २०.३, मेडशी ९.५, करंजी १८.८, चांडस ३२.५, मंगरूळपीर १६.३, आसेगाव १९.८, पोटी १५.५, पार्डी तड १५ मिलिमिटर.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com