Rain Update : अखेर पावसाचं 'कमबॅक', आज कुठे कुठे पडला पाऊस

Swapnil Shinde

जोरदार कमबॅंक

अखेर गेल्या दोन महिन्यांपासून पाठ फिरवलेल्या पावसाने राज्यभरात जोरदार कमबॅक केले

Rain Update

खानदेशात रात्रीपासून

रात्रीपासून नाशिक, धुळे आणि जळगाव शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पुनरागमन केल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले.

Rain Update

मराठवाड्यात हलक्या स्वरुपाचा

मका, सोयाबीन, कापूस पिकासह खरिपातील बहुतांश पिके जळून गेल्याचे पावसाची आतुरतेने वाट बघणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले

Rain Update

पश्चिम महाराष्ट्रात रिमझिम

पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात आज दुपारपासून रिमझिम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय

Rain Update

पश्चिम विदर्भात पिकांना नवसंजीवनी

पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यात आज जोरदार पाऊस पडला. त्यामुळे  सोयाबीन, तूर, हळद , कपाशी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. 

Rain Update

समुद्रात कमी दाबाचा पट्टा

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पालघर, रायगड जिल्ह्यांमध्येही मुसळधार पाऊस पडतोय.

Rain Update

रविवारनंतर जोर कमी

रविवारनंतर पाऊस कमी होईल, असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त करण्यात आला आहे.

Rain Update
gautami-patil | Agrowon
आणखी पहा...