मधमाशी दिन का साजरा केला जातो?

Wrold Bee Day- मधमाशी दिन का साजरा केला जातो? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल तर तेही सांगणार आहोतच. पण त्याआधी परागकण गोळा करणाऱ्या या मधमाश्यांचे महत्त्व समजून घेऊ.
Bee
BeeAgrowon

मधमाशा, (Bees) पक्षी आणि वटवाघूळ जगातील 35 टक्के शेतमालामध्ये परागीकरण करतात. प्रमुख ८७ पिकांचे परागीकरण मधमाशांमुळे तयार होतात. ज्यामुळे मानवाला अन्नधान्य उत्पादन मिळते. एवढेच नाही तर आहारात वापरल्या जाणाऱ्या दर चार पिकांपैकी तीन पिकांना परागकणाची गरज असते. त्यामुळे परागकणाच्या अवतीभोवती घोंगवणाऱ्या मधमाश्यांचे महत्त्व आज जागतिक मधमाशी दिनाच्या (World Bee Day) निमित्ताने जाणून घेऊ.

मधमाशी दिन का साजरा केला जातो? असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल तर तेही सांगणार आहोतच. पण त्याआधी परागकण गोळा करणाऱ्या या मधमाश्यांचे महत्त्व समजून घेऊ. आजूबाजूला दिसणारे प्रत्येक प्राणी आणि पक्षी महत्त्वाचे असतात. या प्राणी आणि पक्ष्यांच्या मदतीने जैवविवधता टिकून ठेवण्यास मदत होते. त्यासाठी निसर्गातील लहान मोठ्या सर्व घटकांची मदत होते.

फुलपाखरापासून ते मधमाश्यापर्यंत सर्वच निसर्गातील अन्नसाखळीचे चक्र फिरते ठेवत असतात. आता मधमाश्यांचे बघा, त्या एका फुलातून परागकण गोळा करून दुसऱ्या फुलांमध्ये टाकतात. त्यामुळे काय होते, तर पोषक अशा फळा-फुलांची निर्मिती होते. त्यामुळे मानवाला चांगल्या फळं, बिया आणि पिकांचे उत्पादन घेता येते.

आज जगभरातील अनेकजण व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाकडे वळाले आहेत. मधमाश्यांच्या पालनामुळे मध तर मिळतोच मात्र त्याचबरोबर विविध पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि पुन्हा पुन्हा उत्पादन घेण्यासाठी मधमाश्या महत्त्वाच्या ठरतात.

मधमाश्या पालनाकडे व्यवसाय आणि जैवविविधता टिकून ठेवण्यासाठीचा चांगला पर्याय म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच आज जगभर मधमाशीपालनाच्या प्रचारासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात.

20 मे 2018 जागतिक मधमाशी दिन साजरा करायला सुरुवात झाली. जगभरातील मधमाश्यांची घटत चाललेली संख्या चिंताजनक आहे. मधमाश्यांचे मानवी आरोग्य आणि परागकणाबद्दलचे योगदान यांचे स्मरण करण्यासाठी स्लोव्हेनियन सरकारने 2016 मध्ये राष्ट्रसंघामोर 20 मे हा दिवस जागतिक मधमाशी दिन म्हणून जाहीर करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर या मागणीला इतरही राष्ट्रांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे 2018 पासून जागतिक मधमाशी दिन साजरा केला जातो.

20 मे तारीख निवडण्याचे कारण म्हणजे आधुनिक मधमाशी पालनाचे जनक अँटोन जना यांचा जन्म 20 मे 1734 रोजी झाला होता. जना यांचा जन्म एक शेतकरी कुटुंबात झाला होता. त्याचे कुटुंब मधमाशीपालनाचा व्यवसाय करत होते.

पुढे जना यांनी मधमाशीपालनाचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी पूर्णवेळ मधमाशीपालनाचा व्यवसाय केला. याच कामाच्या अनुभवातून जना यांनी जर्मन भाषेत पुस्तक लिहिले केले. जना यांच्या कार्याची आठवण म्हणून जागतिक मधमाशी दिन 20 मे रोजी साजरा करण्यात येतो.

Bee
' गुलमोहर डे ' आजच का साजरा होतो?

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com