Shirpur Sugar Mill : ‘शिरपूर कारखाना केव्हा सुरू होणार?’

Sugar Industry : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिवाजीनगर दहिवद, ता. शिरपूर) भाडेतत्त्वावर देण्यास सर्व सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेने बहुमताने मंजुरी दिली.
Sugar Mill
Sugar MillAgrowon
Published on
Updated on

Dhule News : शिरपूर शेतकरी सहकारी साखर कारखाना (शिवाजीनगर दहिवद, ता. शिरपूर) भाडेतत्त्वावर देण्यास सर्व सभासदांनी विशेष सर्वसाधारण सभेने बहुमताने मंजुरी दिली. यानंतर कारखाना भाडेतत्त्वावर होण्याची कार्यावाही मागील वर्षी झाली. पण कारखाना सुरू झाला नाही.

यंदा कारखाना सुरू करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कारखाना सुरू करण्याच्या अनुषंगाने मागील वेळेस कार्यवाही सुरू झाली आहे. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने झाली.

पण पुढे कारखाना सुरू झाला नाही. शिरपूर तालुका ऊस लागवडीत पुढे आहे. शेतकरी केळी, फळ पिकांमध्ये जोखीम असल्याने उसाची लागवड करतात. कारखाना सुरू झाल्यास ऊस लागवड वाढू शकते. कारण शिरपुरात जलसाठे मुबलक आहेत.

Sugar Mill
Sugar Mill Loan : साखर कारखान्यांना शासन हमीवर कर्ज

शिरपूर कारखाना क्षेत्रात अधिक उत्पादनक्षम जमीन आहे. ऊस पिकासाठी लागणारे मुबलक पाणी आहे. यामुळे कारखाना सुरू व्हावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांचा आहे. पण अनेक वर्षे हा कारखाना बंद आहे. नाइलाजाने शेतकऱ्यांना जळगाव, नाशिक, नगर भागांतील कारखान्यांना ऊस द्यावा लागतो. कारखाना भाडेत्त्वावर देण्यासंबंधी १० सप्टेंबर २०२२ ला विशेष सर्वसाधारण सभा झाली होती.

Sugar Mill
Sugar Mill Loan : साखर कारखान्यांसाठी १३५६ कोटींचे नवे कर्जप्रस्ताव

सभासदांनी रखाना भाडेत्त्वावर देण्यास बहुमताने मंजुरी दिली. कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक झाली. पण कारखाना सुरू झाला नाही. यंदाही काय होईल, याबाबत स्पष्टीकरण आलेले नाही. गेल्या दहा वर्षांपासून कारखाना बंद असल्याने कारखान्याच्या मालमत्तेची झीज होऊन सर्व मशिनरी खराब झाली. दिवसेंदिवस ती अधिकच खराब होत आहे.

कारखाना लाभदायी

कारखाना मुंबई-आग्रा महामार्गावर, शिरपूर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर, कारखान्यापासून मध्य प्रदेश केवळ १७ किलोमीटरवर, अनेर आणि करवंद धरणासारखे लघू आणि मोठे पाटबंधारे प्रकल्प तसेच तापी नदी जवळ. जागोजागी प्रत्येक नदी व उपनदीवर केटीवेअर बंधारे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात चार तालुके, १६६ गावांचा समावेश.

त्यांपैकी १२४ गावे शिरपूर तालुक्यात. मध्य प्रदेश, चोपडा तालुक्यांतील गावे कारखाना कार्यक्षेत्रात, एकूण सभासदसंख्या १३ हजार ७००, कारखाना २५०० टीसीडी क्षमतेचा, ऊस लागवडीखालील जमीन ५,३०,३८४.०० हेक्टर, यापैकी ७० टक्के जमीन सिंचनाखाली, कारखाना सुरू असताना कारखान्याची गाळपक्षमता औरंगाबाद विभागात सर्वाधिक ऊसगाळप.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com