Weekly Bazaar : डहाणू तालुक्यात ग्रामीण भागांत आठवडा बाजार सुरू

अर्थचक्राला गती; प्रमुख गावांत वर्दळ वाढली
 Weekly Bazaar
Weekly Bazaar

कासा : दिवाळीनंतर पुन्हा एकदा डहाणू (Dahanu) तालुक्यातील ग्रामीण भागात आठवडा बाजार (Weekly Bazaar) सुरू झाल्याने अर्थचक्राला गती मिळाली आहे. ग्रामीण भागात गावदेव पूजन कार्यक्रम झाल्यावर बहुतेक ठिकाणी आठवडा बाजार सुरू केला जातो. डहाणू तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये गावदेवाचे पूजन झाले असून प्रमुख गावांमध्ये बहुतेक ठिकाणी आठवडे बाजार सुरू झाले आहेत.

 Weekly Bazaar
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा काळाबाजार?

ग्रामीण भागातील मुख्य गावात आठवडा बाजार भरत असतो. या आठवडा बाजारामध्ये अनेक छोटे-मोठे व्यापारी दुकानदार, लहान विक्रेते आपला माल विकण्यासाठी येत असतात. या आठवडा बाजारात दुर्गम भागातील खेड्यापाड्यातून नागरिक संसारोपयोगी वस्तू खरेदी करीत असतात. मोलमजुरी करणारे गरीब आदिवासी, कातकरी नागरिक या बाजारांमध्ये खरेदी करीत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असते.

 Weekly Bazaar
आंबेगाव तालुक्यात  बटाटा लागवड सुरू 

डहाणू तालुक्यातील आशागड, गंजाड, कासा, तलवाडा, सायवन, उधवा येथील आठवडे बाजार प्रसिद्ध आहेत. या आठवड्यात बाजारामध्ये उंबरगाव, डहाणू, पालघर, मुंबई, ठाणे येथील अनेक व्यापारी विक्रेते आपला माल घेऊन येत असतात. यामध्ये किराणा धान्य, रेडीमेड कपडे, साड्या, तेल, मसाले, कांदा, बटाटा, चपला, भाजीपाला, डाळी, सुके मासे इत्यादीचा समावेश असतो. सध्या विट उद्योग, गवत, पेंढ्यांचा उद्योग सुरू झाल्याने शेतकऱ्याकडे थोडे आर्थिक पाठबळ मिळाले आहे. मोलमजुरी करणाऱ्याच्या हाती पै-पैसा येत आहे. यामुळे सर्वसामान्यांची क्रयशक्ती वाढल्याने ग्रामस्थ या आठवडी बाजारात खरेदी करत आहेत.

मागील महिन्यात गावदेव पूजन झाल्यावर आठवडा बाजार सुरू झाला. दैनदिन गरजेच्या वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत. पाऊस, शेतपिकांचे झालेले नुकसान, तसेच अनेक कुटुंबे कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने पाहिजे, तसा व्यवसाय होत नाही.

- शामराव सोनी, विक्रेता

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com