आंबेगाव तालुक्यात  बटाटा लागवड सुरू 

बटाटा उत्पादनाचे आगार असणाऱ्या आंबेगाव तालुक्‍यातील लौकी, महाळुंगे पडवळ, कळंब, चास आदी ३० गावांत रब्बी हंगामातील बटाटा लागवडीला सुरुवात झाली आहे.
आंबेगाव तालुक्यात  बटाटा लागवड सुरू  In Ambegaon taluka Start planting potatoes
आंबेगाव तालुक्यात  बटाटा लागवड सुरू  In Ambegaon taluka Start planting potatoes
Published on
Updated on

महाळुंगे पडवळ, जि. पुणे : बटाटा उत्पादनाचे आगार असणाऱ्या आंबेगाव तालुक्‍यातील लौकी, महाळुंगे पडवळ, कळंब, चास आदी ३० गावांत रब्बी हंगामातील बटाटा लागवडीला सुरुवात झाली आहे. मजूरटंचाईवर मात करण्यासाठी ट्रॅक्‍टरच्या साह्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.  हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण) १०० टक्के भरले आहे. तसेच घोडनदी, उजव्या व डाव्या कालव्यांना पाणी सोडले आहे. त्यामुळे शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले आहे. चांडोली बुद्रुक, महाळुंगे पडवळ, नांदूर, टाकेवाडी, विठ्ठलवाडी, थोरांदळे, भराडी, नागापूर, जाधववाडी, रांजणी आदी ४० गावांत बटाटा लागवड केली जात आहे. नगदी पैसे मिळवून देणारे पीक म्हणून बटाटा पीक आहे. कोरोनामुळे बटाटा लागवड करण्यासाठी मजुरांची टंचाई आहे. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्‍टरच्या साह्याने लागवडी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.   ‘‘चार एकर क्षेत्रात बटाटा बियाण्याची लागवड केली आहे. लागवडीसाठी मजूर उपलब्ध होत नसल्याने यांत्रिकीकरणाचा वापर बटाटा लागवड करत आहेत. एक हजार रुपये तास या प्रमाणे ट्रॅक्‍टरद्वारे लागवडीचा दर आहे. यंत्राद्वारे लागवड केल्यामुळे बियाणे जमिनीत गाडून सरी वरंबा तयार होतो. तसेच वेळ, पैसा व खर्चात मोठ्या प्रमाणात बचत होते,’’ असे लौकी येथील शेतकरी श्रीकांत थोरात यांनी सांगितले.  ‘‘बटाटा वाणाचे बाजारभाव या वर्षी कमी आहेत. तसेच धरण भरल्याने शाश्‍वत पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे बटाटा लागवड क्षेत्रात वाढ होईल. जवळपास २५० हेक्‍टर क्षेत्रात रब्बी हंगामात लागवड होईल असा अंदाज आहे,’’ असे आंबेगाव तालुक्‍याचे कृषी अधिकारी टी. के. चौधरी यांनी सांगितले.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com