OBC Reservation: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार?

सध्या सगळीकडे पाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी पूर येत आहे आणि अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी यंत्रणा तयार करणे अवघड आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाशी (State Election Commission) चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ (Ekanath Shinde) शिंदे म्हणाले.
Ekanath Shinde
Ekanath ShindeAgrowon
Published on
Updated on

(वृत्तसंस्था)

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) दोन दिवसांपूर्वी राज्यातील ग्रामपंचायत आणि नगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. पण या निवडणुका पुढे ढकलण्याबाबत चर्चा करणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सागितले. सध्या पावसाळा आहे, अडचणी निर्माण होऊ शकतात, पावसाळ्यात मनुष्यबळही जास्त लागेल, त्यासाठी या निवडणुका पुढे ढकलण्यात याव्यात यावर आयोगाशी चर्चा करणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

ओबीसी आरक्षणासंदर्भातील (OBC Reservation) प्रकरण सध्या न्यायालयात दाखल आहे. यावर निर्णय येणे बाकी आहे पण आरक्षणावर निर्णय झाल्यावर निवडणुका घ्याव्यात अशी आमची पहिल्यापासून इच्छा आहे. सध्या सगळीकडे पाऊस आहे, बऱ्याच ठिकाणी पूर येत आहे आणि अशा परिस्थितीत निवडणुकीसाठी यंत्रणा तयार करणे अवघड आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाशी (State Election Commission) चर्चा करणार असल्याचे शिंदे म्हणाले.

Ekanath Shinde
Ekanath Shinde : आषाढी एकादशीनंतर मंत्रीमंडळ विस्तारावर चर्चा करू: शिंदे

आता निवडणुकीला सामोरे जाण्याखेरीज पर्याय नाही : अजित पवार

निवडणूक आयोगाने निवडणूका जाहिर केल्यामुळे त्याला सामोरे जावे लागणार आहे, सध्या कोकणात पाऊस सुरु आहे, सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन केले होते. आता निवडणूका जाहिर झाल्यामुळे सर्वांपुढेच पर्याय नाही, न्यायालयात जाऊ शकतात पण न्यायालयातही एकदा निवडणूक जाहिर झाल्यानंतर त्यात बदल करत नाही असा अनुभव असल्याची प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केली.

Ekanath Shinde
State Elections Commission : ओबीसी आरक्षणाशिवाय होणार ९२ नगरपालिका, ४ नगरपंचायतीच्या निवडणुका

राज्यातील ९२ नगरपरिषद व ४ नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मात्र राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर (OBC Reservation) कोणताही निर्णय येण्याआधीच ही निवडणूक होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde ) यांनी ट्विट करत मत व्यक्त केले.ओबीसी आरक्षण संदर्भात महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या आयोगाचा अहवाल तयार आहे व त्यामुळे नवीन सरकारने तातडीने योग्य ती कार्यवाही पूर्ण केली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी सुचक ट्वीट करत नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सल्ला दिला आहे. ‘ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी’, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी दिली आहे.“काही ठिकाणी नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या गोष्टीची दखल घ्यावी आणि ओबीसी आरक्षण देऊनच निवडणुका होतील, अशी खंबीर पावलं उचलावी. सरकारकडून न्याय मिळेल हा विश्वास आहे”, असं ट्वीट पंकजा मुंडे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com