Inflation : आपल्याकडे महागाई आहे, पण अमेरिकेऐवढी नाही!

देशात महागाई आहे, हे मी मान्य करतो, मात्र अमेरिका, चीनच्या तुलनेत आपल्याकडे महागाई कमी आहे, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी बुधवारी (ता. ३१) येथे केले.
Inflation
InflationAgrowon

नाशिक : देशात महागाई (Inflation) आहे, हे मी मान्य करतो, मात्र अमेरिका, चीनच्या (America Inflation) तुलनेत आपल्याकडे महागाई कमी आहे, असे विधान केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांनी बुधवारी (ता. ३१) येथे केले.

Inflation
Inflation : महागाई, दडपशाहीविरोधात काँग्रेसची निदर्शने

महानुभाव पंथीय साधू व समाजबांधवांचे अधिवेशनाचा आज समारोप झाला. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात दररोज महागाई वाढते आहे. सामान्य नागिरकांना त्याचा त्रास होते. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर सतत वाढत आहेत. सर्व वस्तूंवर जीएसटी लागू करण्यात आला आहे. त्यावर काय उपाययोजना करणार का? यावर ते म्हणाले, देशात महागाई आहे हे मी देखील मान्य करतो.

Inflation
Inflation : फळे-भाज्यांना महागाईचे प्रतीक समजणे चुकीचे

मात्र अमेरिका, चीनच्या तुलनेत आपल्या देशात कमी महागाई आहे. आम्ही दोन वेळा डिझेल, पेट्रोलचे दर कमी केले आहेत. राज्याचा जीएसटी हे सेसच्या नावाने लावले जात होते. आता सुट्ट्या मालावर जीएसटी लागणार नाही. सुट्या साहित्यावर कोणताही जीएसटी नाही. केवळ पॅकिंग साहित्यावर जीएसटी आहे. सुटे तेल विकायलाही निर्बंध नाही.

सर्व सण साजरे करा

ते पुढे म्हणाले, संपूर्ण देशात गणेशाचे उत्साहात आगमन झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळे सण उत्साहात साजरे करायला सांगितले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com