Nanded Rain : मुसळधार पावसाने नांदेड जलमय

Nanded Rain Update : पावसाचे प्रमाण प्रचंड मोठे असल्यामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांसह ५७ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
Rain Update
Rain Update Agrowon
Published on
Updated on

Nanded News : जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा जलमय झाला आहे. पावसाचे प्रमाण प्रचंड मोठे असल्यामुळे जिल्ह्यातील दहा तालुक्यांसह ५७ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. २४ तासांत सरासरी ९०.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

चार मंडलांत दोनशे मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. खरीप पिकांच्या नुकसानीसह घराची पडझड झाली आहे. जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून पावसाचे पुनरागमन झाले आहे. हा पाऊस सर्वच तालुक्यांत होत असल्यामुळे नदी-नाले भरून वाहत आहेत.

Rain Update
Rain Update : पिकांना पावसाचा दिलासा

गुरुवारी सकाळपासूनच दिवसभर मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला, तसेच अनेकांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाकडून सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Rain Update
Pune Rain Update : सर्वदूर संततधार

पावसाचे प्रमाण अधिक असल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सर्व शासकीय यंत्रणा दक्ष राहण्याच्या सूचना तसेच नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी सकाळी सुरू झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंत सुरू होता. नांदेड ग्रामीणमध्ये २२५.५०, गोळेगाव २०२.२५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

जिल्ह्यातील दहा तालुक्यांसह ५७ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे मागील २४ तासांत सरासरी ९०.३० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ५५९.१० मिलिमीटरनुसार ६२.७३ टक्के पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com