Water Tanker : जत, आटपाडी तालुक्यांत २१ गावांना टँकरने पाणी

Water Shortage : यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली, तरी शेतीसाठी अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही.
Water Crisis
Water CrisisAgrowon

Sangli News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत पावसाने हजेरी लावली. दुष्काळी जत तालुक्यात १८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्याचबरोबर आटपाडी तालुक्यातील तीन गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जिल्ह्यात पाण्याचे २१ टँकर सुरू आहेत. २२ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यातील १७ विहिरी जत तालुक्यातील, तर चार आटपाडी तालुक्यातील आहेत. एक विहीर कवठेमहांकाळ तालुक्यातील आहे.

Water Crisis
Water Crisis : पाणीसाठ्यांनी वाढवली चिंता

यंदा पाऊस उशिरा सुरू झाला. दीड महिन्याच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली, तरी शेतीसाठी अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यामुळे आणखी पावसाची गरज व आशा आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने सातत्याने हजेरी लावली. मात्र दुष्काळी जत तालुक्यात अजूनही पाण्याची प्रतीक्षा आहे. जत तालुक्यातील १८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

Water Crisis
Water Crisis : नाशिक जिल्ह्याच्या पूर्व पट्ट्यात भर पावसाळ्यात टँकर सुरूच

पावसाने पुन्हा दांडी मारल्यास टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू शकते. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जुलै, ऑगस्टमध्ये टंचाईग्रस्त गावांची संख्या वाढू शकेल, टँकरने पाणीपुरवठा करावा लागू शकेल, असा अंदाज वर्तवला. त्याचा फटका विशेषकरून जत तालुक्याला बसण्याची शक्यता आहे. सध्या जत तालुक्यात १८ गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे, तर आटपाडी तालुक्यातील तीन गावांना पाणी पुरविण्यात येत आहे.

जत तालुका

निगडी खु. -१, शेड्याळ -१, सिंदूर-२, पांढरेवाडी -१, वळसंग -१, एकुंडी -१, हळ्ळी -१, बसर्गी -१, सोन्याळ -२, सालेगिरी पाच्छापूर -१, कुडणूर -१, वायफळ-१, गुगवाड -१, गिरगाव-१, संख-१, जाडरबोबलाद- १. एकूण १८ टँकर

आटपाडी तालुका

आंबेवाडी-१, पुजारवाडी दि- १, पिंपरी खु. -१ एकूण ३ टँकर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com