Hatnoor Dam : हतनूर, वाघूर, गिरणा प्रकल्पांतील साठ्यात वाढ

Dam Water Storage : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दमदार पावसास सुरवात झाली आहे. मध्य प्रदेश, विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर (ता. भुसावळ) धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे.
Hatnoor Dam
Hatnoor DamAgrowon

Jalgaon News : गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात दमदार पावसास सुरवात झाली आहे. मध्य प्रदेश, विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळे हतनूर (ता. भुसावळ) धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे.

धरणाच्या कॅटमेंट एरियात पावसामुळे धरणातील साठा वाढून धरणाचे चार गेट अर्धा मीटरने उघडले आहेत. मध्यम प्रकल्पातील अभोरा, मंगरूळ, सुकी धरणे शंभर टक्के भरली. अग्नावती, भोकरबारी, बारी धरणात ठणठणाट आहे.

Hatnoor Dam
Water Storage : उपयुक्त पाणीसाठा २८ टक्क्यांवर

२५ व २६ जूनला काहीसा पाऊस झाला. नंतर पावसाने दडी मारली. मात्र, ६ जुलैपासून शहरासह जिल्ह्यांत काही भागात दमदार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. पावसाअभावी निराश झालेल्या शेतकऱ्यांमध्ये आशादायी वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच ठिकाणी खोळंबलेल्या पेरण्या पूर्णत्वाकडे आल्या आहेत.

‘अलनिनो’च्या प्रभावामुळे यंदा मे महिना अतिशय कडक उन्हाचा गेला. एप्रिलपर्यंत अवकाळी पाऊस सुरू होता. तेव्हाच ‘अल निनो’ इफेक्टमुळे यंदा पाऊस उशिराने येईल, असा इशारा दिला होता. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाने जुलै-आगस्टपर्यंत पाणीटंचाईचे नियोजन केले होते.

Hatnoor Dam
Dam Water Storage : रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांत ३६.५२ टक्केच पाणीसाठा

जून महिन्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले. नंतर ‘बिपरजॉय’ वादळामुळे मान्सूनची पुढील वाट अडली. काही दिवसांपूर्वी वादळ शांत झाल्याने मान्सून पुढील वाटचाल करू लागला आहे.

मध्य प्रदेश, गुजरातमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील पुणे, मुंबईला चांगला पाऊस झाला. जळगाव जिल्ह्यात दोन दिवसांपासून रोज पाऊस हजेरी लावत आहे. यामुळे नद्या, नाल्यांना पाणी येऊ लागले आहे. मोठ्या धरणाच्या जलसाठ्यातही वाढ होऊ लागली आहे.

धरणातील जलसाठा असा

धरण- -आजचा जलसाठा मागील वर्षीचा साठा

हतनूर --३८.४३ टक्के- -१८.१२ टक्के

गिरणा- -२०.५५- -३३.६३

वाघूर-- ५६.५२ ६१.८१

अभोरा- -१००- -५५.६३

मंगरूळ- -१००- -४०.०७

सुकी- -१००- -७४.५६

मोर- -७१.४८- -५५.६८

अग्नावती- -०.००- ०.००

हिवरा- -०.००- -०.००

बहुळा-- १५.११-- २४.२०

तोंडापूर-- ३१.७०-- ४३.०२

अंजनी-- ११.३५-- २४.६१

गूळ-- ६२.८१- -३६.७०

भोकरबारी-- ०.००-- १३.२६

बोरी-- ०.००-- ४.९५

मन्याड-- ५.४४-- १३.८६

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com