Tomato Price : आता मिळणार टोमॅटो ५० रुपये किलोने, सरकारचा निर्णय

Tomato Rate : केंद्र सरकारने एनसीसीएफ व नाफेडला स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटोची विक्री ५० रुपये किलो दराने करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत.
Tomatoes
TomatoesAgrowon

Central Government : केंद्र सरकारने एनसीसीएफ व नाफेडला स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटोची विक्री ५० रुपये किलो दराने करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. केंद्राच्या ग्राहक व्यवहार विभागाकडून निर्देश जारी केले.

दरम्यान मागच्या तीन महिन्यांपासून टोमॅटोच्या दराने उच्चांक गाठला होता. तो मागच्या काही दिवसांत घाऊक बाजारामध्ये दरात काहीशी घसरण झाली असे ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

घाऊक बाजारातील दर कमी झाल्याने टोमॅटोची प्रतिकिलो ५० रुपये दराने आज (ता.१६) विक्री करावी, असा आदेश केंद्र सरकारने नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (एनसीसीएफ), नॅशनल अॅग्रिकल्चरल को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (नाफेड) या संस्थांना दिला. जुलैपासून 'एनसीसीएफ', 'नाफेड' या संस्था दिल्लीसह चार राज्यांत टोमॅटो सवलतीच्या दरात विकत आहेत.

१४ जुलैपासून दिल्ली व एनसीआरमध्ये टोमॅटोची स्वस्त दरात विक्री सुरू झाली आहे. १३ ऑगस्टपर्यंत नाफेड व एनसीसीएफने किरकोळ बाजारात १५ लाख किलो टोमॅटोची खरेदी व विक्री केली.

Tomatoes
Tomato Price : टोमॅटोचा भाव वाढलेलेच, केंद्र सरकारचा दर नियंत्रणासाठी आटापिटा

एनसीसीएफ व नाफेडने सुरुवातीला टोमॅटो ९० रुपये प्रतिकिलो दराने विकले, नंतर ८० व नंतर ७० रुपयांपर्यंत दर कमी करण्यात आले. आता स्वातंत्र्य दिनापासून टोमॅटो ५० रुपये किलोने विकला जाणार आहे.

नाशिकच्या सर्वच बाजार समित्यांत टोमॅटोच्या दरात जवळपास ५० टक्क्यांची घसरण झाली असतानाच नाफेडच्या विक्रीने कांद्याचे पदर नीच्चांकी प्रवास करू शकतात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com