Water Shortage : यंदा पाणीटंचाईचे सावट

उन्हाच्या तीव्र झळा बसत असून धरणांतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon
Published on
Updated on

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Water Shortage News डोंबिवली : जिल्ह्यात उष्णतेचा पारा (Temperature) चढला असून जनता हैराण झाली आहे. उन्हाच्या तीव्र झळा (Summer Heat) बसत असून धरणांतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत बारवी व भातसा धरणातील (Bhatsa Dam) पाणीसाठा (Water Storage) हा अनुक्रमे पाच ते तीन टक्क्यांनी खाली आला आहे; तर मध्य वैतरणामध्ये केवळ २२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

पाण्याची खालावलेली पातळी पाहता पाणीकपातीचे संकट घोंगावू लागल्याचे दिसते. सध्याच्या घडीला पाणीकपात होत नसली तरी देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली पाणीपुरवठा बंद ठेवणे आणि त्यानंतरचा परिणाम यामुळे पाणीटंचाई होत आहे.

मार्च २०२२ मध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा हा २०२१ च्या पाणीसाठ्याच्या तुलनेत पाच ते सात टक्क्यांनी जास्त होता.

१५ जुलैपर्यंत पाण्याचे नियोजन करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाकडून आढावा घेतला जात आहे.

पावसाळ्यास चार महिने शिल्लक असून, त्यानुसार योग्य वेळी योग्य निर्णय घेतले जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Water Shortage
Water Shortage : रोहा तालुक्यात पाणीटंचाईचे सावट

लघु पाटबंधारे विभाग मंजूर कोटा (दललि)

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण १४०

स्टेम ठाणे ३१६

कल्याण-डोंबिवली पालिका ३२०

औद्योगिक महामंडळ अंबरनाथ ९०४

इतर संस्था ३४

ग्रामपंचायत १

रायगड पालिका विभाग १०

सिंचन ३०९

Water Shortage
Water Shortage : रत्नागिरीत भूजल पातळीत कमालीची घट

चटके...

जिल्ह्यात अनेक महत्त्वाची धरणे असूनही, फक्त जिल्ह्यासाठी स्वतंत्र धरण नाही. बारवी धरणाची उंची वाढवण्याचा प्रश्न निकालात लागून धरणाची उंची वाढविण्यात आल्यानंतर जिल्ह्यावरील कायमस्वरूपी असणारे पाणीकपातीचे संकट दूर झाले आहे, असे म्हणण्यास हरकत नाही; परंतु वाढती लोकसंख्या पाहता हे धरण देखील आता अपुरे पडू लागले आहे.

फेब्रुवारी महिन्यापासून जिल्ह्याला उन्हाच्या तीव्र झळा बसू लागल्या असून, पारा चाळिशीच्या आसपास राहत आहे. कडक उन्हाळ्यासह नागरिकांना पाणीटंचाईची समस्याही सतावू लागली आहे. उन्हामुळे पाण्याच्या पातळीत घट होत असल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com