Water Shortage : रोहा तालुक्यात पाणीटंचाईचे सावट

रोहा तालुक्यातील भालगाव परिसरातील अनेक गावांना तीव्र टंचाई जाणवत आहे. या भागातील फणसवाडी गाव हे डोंगराळ व दुर्गम भागात वसलेले आहे.
Roha News
Roha NewsAgrowon

Roha News : उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तालुक्यातील ग्रामीण डोंगराळ व दुर्गम (Rural Area) भागातील खासगी व सार्वजनिक विहिरींनी तळ गाठला आहे. परिणामी, पिण्याच्या पाण्यासाठी (Water Stock) ग्रामस्थांना दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. पाणी योजना (Water Scheme) मंजूर आहे;

पण काम पूर्ण न झाल्यामुळे ग्रामस्थांचे पाण्यावाचून हाल (Water Shortage) होत आहे. त्यामुळे गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply) व्हावा, अशी लेखी मागणी संतप्त ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे केली आहे.

रोहा तालुक्यातील भालगाव परिसरातील अनेक गावांना तीव्र टंचाई जाणवत आहे. या भागातील फणसवाडी गाव हे डोंगराळ व दुर्गम भागात वसलेले आहे. येथील ग्रामस्थांना प्रतिवर्षी पाण्याची भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच ग्रामस्थांना विशेषतः महिलांना पिण्याच्या हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गावाला टंचाईग्रस्त गाव घोषित केले आहे.

Roha News
Animal Hospital : पशू दवाखान्यात ना वीज ना पाणी

ग्रामस्थांना बारामाही पाणी मिळावे म्हणून प्रशासनाच्यावतीने जलजीवन योजना मंजूर करण्यात आली आहे. असे असताना योजना अद्याप पूर्ण न झाल्यामुळे यंदाही ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

ही योजना कार्यान्वित होईपर्यंत गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी पत्राद्वारे मागणी रमेश वरक, गोविंद हिरवे, महादेव शिंदे, दीपक गोरे, शागा हिरवे, अंनता महाबळे, पांडुरंग वरक, चंद्रकांत गोरे आदी ग्रामस्थांनी केली आहे.

या संदर्भात आमदार अदिती तटकरे, तहसीलदार, गटविकास अधिकारी, ग्रामपंचायत भालगाव व ग्रामसेवक यांच्याकडे केली आहे.

Roha News
Water Resource : कल्लोळामधील पाणी का थांबले?
फणसवाडी ग्रामस्थांना गेली अनेक दिवस पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. गावातील व लगतच्या परिसरातील विहिरी आटल्यामुळे दूरवरून ग्रामस्थ व महिलांना पाणी आणावे लागते. गावात जलजीवन योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. प्रशासनाने जातीने लक्ष द्यावे ही विनंती.
गोविंद हिरवे, ग्रामस्थ, फणसवाडी, रोहा
सद्यस्थितीत एकही गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा होत नाही. टंचाईग्रस्त गावांची प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर जर एक किलोमीटरच्या आत अन्य कोणताही पाण्याचा स्रोत उपलब्ध नसेल, तर पाणी दिले जाते.
रूपाली म्हात्रे, उपअभियंता, पाणी पुरवठाविभाग, पाली पंचायत समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com