

Dilip Walse Patil News : राज्यात अतापर्यंत कमी दिवस पाऊस झाला. मगील दोन ते तीन आठवड्यांपासून पाऊस नाही. त्यामुळे यंदा साखर उत्पादनाबाबत चिंता आहे. ऊस पिकाला फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुढील गाळप हंगाम संकटाचा असू शकतो, अशी चिंता व्यक्त केली.
राज्यात आतापर्यंत पाऊसमान खूपच कमी झाले. जून महिन्यात राज्यात पावसाने दडी दिली. माॅन्सून उशीरा दाखल झाला. त्यातच माॅन्सून येऊनही पाऊस नव्हता. जूनच्या शेवटीच्या तीन दिवसांमध्ये काही प्रमाणात पाऊस पडला. तर जुलै महिन्यात जोरदार पाऊस झाला. पण जुलै महिन्यात शेवटच्या दोन आठवड्यांमध्येच चांगला पाऊस झाला. यामुळे राज्यातील पावसाची सरासरी भरून निघाली. म्हणजेच यंदा कमी दिवसांमध्ये जास्त पाऊस पडला. पण हा पाऊस पिकांसाठी पोषक नाही.
दिलीप वळसे पाटील पुणे येथील वसंतदादा शुगर इंस्टीट्यूट येथे आले होते. त्यावेळी त्यांनी ऊस पीक आणि गाळप हंगामाविषया भाष्य केले. मंत्री वळसे पाटील म्हणाले की, नुकत्याच पार पडलेल्या गाळप हंगामात ऊस गाळप कमी झाले. राज्यातील साखर कारखान्यांनी यंदाच्या हंगामात गेल्या हंगामाच्या तुलनेत कमी उसाचे गाळप केले. तसेच साखर उत्पादनही कमी झाले.
गेल्या हंगामात साखर उद्योगाची प्रगती चांगली राहीली नाही. यंदाही अशीच परिस्थिती राहू शकते, असा अंदाज आहे. राज्यात जून आणि जुलै महिन्यात कमी पाऊस झाला. तसेच धरणांमधील पाणीसाठीही समाधानकारक नाही. सरकार धरणांमध्ये उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेऊन उपलब्धतेप्रमाणे पाण्याचे वितरण करेल, असाही मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.
साखर उत्पादनात घट
नुकत्याच पार पडलेल्या हंगामात राज्यात साखर उत्पादनात मोठी घट झाली. यंदाच्या हंगामात २१० साखर कारखान्यांनी १०५ लाख टन साखर निर्मिती केली. तर मागील हंगामात १३७ लाख टन साखर उत्पादन महाराष्ट्रात झाले होते. सहकार खाते या परिस्थितीवर बारिक लक्ष ठेऊन आहे. तसेच साखर कारखान्यांशी समन्वय ठेऊन आहे. तसेच साखरेची किमान विक्री किंमत वाढविण्यासाठी पाठपुरावा करत आहे, असे मंत्री वळसे पाटील यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
नुकत्याच संपलेल्या हंगामात गेल्यावर्षीपेक्षा ऊस गाळप आणि साखर निर्मिती कमी झाली. यंदाही अशीच परिस्थिती राहण्याची भीती आहे. पाऊस कमी आहेच. शिवाय धरणांमध्येही पाणीसाठी खूपच कमी आहे.
- दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.