Team Agrowon
अनेकदा आकाशाकडे तासनंतास पाहत बसणं काहीजणांना खूप आवडतं. आकाशातील तारे बघण्याचा देखील अनेकांना छंद आहे.
अशाच ग्रह आणि आकाशप्रेमींसाठी येत्या १३ ऑगस्टला पर्वणी असणार आहे. कारण यावेळी पृथ्वीवर उल्कापात होणार आहे.
या दिवशी फक्त उल्कापात होणार नाही तर उल्कांचा पाऊस होणार आहे. आणि ती आपल्याला पहायला मिळणार आहे. याच लाईव्ह प्रक्षेपण देखील होणार आहे.
प्रकारची खगोलशास्त्रीय घटना आहे, ज्याला पर्सीड्स उल्का वर्षाव म्हणून ओळखले जातं
जेव्हा धूमकेतु स्विफ्ट-टटल पृथ्वीजवळून जातो तेव्हा त्याचे कण पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करतात आणि ते वेगाने जमीनीवर पडतात
पर्सीड्स उत्तर गोलार्धात चांगल्या प्रकारे दिसेल आणि गडद ठिकाणी दर मिनिटाला एक उल्का दिसू शकेल.
12 किंवा 13 ऑगस्ट रोजी सूर्योदयापूर्वी उल्कापिंडाची मोठ्या प्रमाणा दिसेल. जर तुम्हाला संध्याकाळी पहायचे असेल तर रात्री 10 नंतर तुम्ही पूर्वेकडे किंवा ईशान्येकडे पाहू शकता.