Rain
Rain Agrowon

Rain Update Parbhani : परभणी, हिंगोलीतील ७ मंडलांत अतिवृष्टी

Parbhani Rain News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम होता. या दोन जिल्ह्यांतील ७८ मंडलांत गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला.
Published on

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील पावसाचा जोर दुसऱ्या दिवशीही कायम होता. या दोन जिल्ह्यांतील ७८ मंडलांत गुरुवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांत हलका ते जोरदार पाऊस झाला.

परभणी जिल्ह्यातील पेडगाव (६८.८ मिमी) जांब (६८.८ मिमी), ताडबोरगाव (६८.८ मिमी), कासापुरी (७२.५ मिमी) या ४ मंडलांत, तर हिंगोली जिल्ह्यातील माळहिवरा (६७.३ मिमी), वसमत (९१.८ मिमी), हयातनगर(९१.८ मिमी) या ३ मंडलांत अतिवृष्टी झाली.

परंतु या दोन जिल्ह्यांतील अनेक मंडलांत अत्यंत हलका पाऊस झाला. चार मंडलांतील अनेक गावांत पावसाने हुलकावणी दिली.

परभणी जिल्ह्यात बुधवारी (ता. ५) दुपारी दोननंतर पाऊस सुरू झाला. सर्व नऊ तालुक्यांतील ५१ मंडलांत अत्यंत हलका ते मुसळधार पाऊस झाला. परभणी, जिंतूर, मानवत, पाथरी तालुक्यातील अनेक मंडलांत पावसाचा जोर होता.

Rain
Marathwada Rain Update : मराठवाड्यातील ३७ मंडलात अतिवृष्टी

५ मिलिमीटरहून कमी पाऊस झालेल्या मंडलात परभणी, दैठणा, सिंगणापूर, झरी, पिंगळी, दूधगाव, बामणी, सेलू, वालूर, कुपटा, चिकलठाणा, महातपुरी, पिंपळदरी, आवलगाव, वडगाव, चुडावा, कावलगाव या मंडलांचा समावेश आहे.

५ ते १५ मिलिमीटर पाऊस झालेल्यांत परभणी ग्रामीण, आडगाव, चारठाणा, वाघी धानोरा, मोरेगाव, कोल्हा, सोनपेठ, गंगाखेड, राणीसावरगाव, चाटोरी, ताडकळस, लिमला, चाटोरी ही मंडले आहेत. उर्वरित मंडलांत १६ ते ७२.२ मिमी पाऊस झाला.

Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात मध्यम पावसाची हजेरी

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २१.१ मिलिमीटर, तर जुलै महिन्यात आजवर एकूण सरासरी ४१.३ (९७.४ टक्के) पाऊस झाला. यंदा १ जूनपासून एकूण सरासरी ९६.८ मिमी (५१.६ टक्के) पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २७ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, वसमत तालुक्यांत पावसाचा जोर होता.

कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांत हलका ते मध्यम पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २१.४ मिलिमीटर, जुलै महिन्यात आजवर सरासरी ४५.१ मिलिमीटर (१०१.१ टक्के), तर जूनपासून एकूण सरासरी ९.२ मिमी (४२.२ टक्के) पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (१५ मिलिमीटरपेक्षा जास्त)

परभणी जिल्हा ः पेडगाव ६८.८, जांब ६८.८, टाकळी कुंभकर्ण २१.८, जिंतूर ६२.८, बोरी ६२.८, देऊळगाव गात १६.८, कुपटा २८, मानवत ४३.५, केकरजवळा ४३.८, ताडबोरगाव ६८.८, रामपुरी १८.५, पाथरी ३७, बाभळगाव ४२.३, हादगाव ४६.५,कासापुरी ७२.५, शेळगाव ५६.५,

राणीसावरगाव २४, पालम ३६.५, पेठशिवणी ४२.३, रावराजूर २१.८, कात्नेश्‍वर २०.३. हिंगोली जिल्हा ः हिंगोली ५३.५, सिरसम ४०.८, बासंबा २०, डिग्रस १५.५, माळहिवरा ६७.३, खंबाळा ४८.३, वसमत ९१.८, हयातनगर ९१.८, गिरगाव २८.३, टेंभुर्णी २८.३, कुरुंदा १७.३, गोरेगाव १८.३.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com