Jaykwadi Dam : जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून विसर्ग सुरू

Kharif Crop : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी (ता. १) खरीप पिकासाठी पाणी पाळी सुरू केली आहे.
Jaykwadi Dam
Jaykwadi DamAgrowon
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar News : कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानंतर जायकवाडी प्रकल्प प्रशासनाने प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून शुक्रवारी (ता. १) खरीप पिकासाठी पाणी पाळी सुरू केली आहे.

अधिक माहितीनुसार, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (ता. २६) कालवा सल्लागार समितीची बैठक खरीप हंगाम २०२३ साठी पार पडली होती.

या बैठकीत मराठवाडा विभागातील जायकवाडी व नांदूर मधमेश्वर जलद कालवा प्रकल्प या दोन प्रकल्पांतून पाटबंधारे विभागामार्फत कालव्यांद्वारे होणाऱ्या सिंचनाची माहिती देण्यात आली होती. उपलब्ध पाण्यातून खरिपाच्या पिकांसाठी पाण्याची आवर्तने देण्यात यावी, अशी भूमिका पालकमंत्री भुमरे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी मांडली होती.

Jaykwadi Dam
Water Crisis : देशातील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर

शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचले पाहिजे, यापद्धतीने आवर्तन असावे. खरिपाची पिके तरी हातात आली पाहिजे; यादृष्टीने पाटबंधारे विभागाने नियोजन करावे, अशी सूचना करण्यात आले होती. जायकवाडी प्रकल्प मराठवाड्यातील महत्त्वाचा प्रकल्प असून त्यात औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, अहमदनगर या जिल्ह्यांचे लाभ क्षेत्र येते.

Jaykwadi Dam
Water Crisis : पश्चिम महाराष्ट्रात पाणीटंचाईत वाढ

बैठकीवेळी या प्रकल्पाचा एकूण जलसाठा २९०९ दलघमी तर उपयुक्त जलसाठा २१७१ दलघमी होता. २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत या प्रकल्पात एकूण उपयुक्त साठा क्षमतेच्या ३३.५६ टक्के पाणी उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे जायकवाडीत उपलब्ध पाण्यात संपूर्ण वजावट करून खरीप पिकाला पाणी देण्यासाठी २०२ एम.एम.क्यू.पाणी उपलब्ध आहे. यानुसार १ सप्टेंबरपासून रोटेशन सोडण्यात यावे असे स्पष्ट करण्यात आले होते.

त्यानुसार केलेल्या केलेल्या नियोजनातून १ सप्टेंबरला कार्यकारी अभियंता, जापावि, नान (उ), पैठण यांच्या आदेशानुसार जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून खरीप हंगाम २०२३-२४ साठी पाणीपाळी सुरू करण्यात आली. शुक्रवारी दुपारी २ ते ३ वाजेदरम्यान १०० क्युसेक विसर्ग सुरू करून कालवा मुखाशी स्थिर करण्यात आला.

हा विसर्ग पुढील आदेशापर्यंत विसर्ग स्थिर राहणार असून टप्प्याटप्प्याने तो वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.२०८ किलोमीटर लांबीच्या या कालव्यातून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या जिल्ह्यातील खरीप पिकांना लाभ होण्याची अपेक्षा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.