Rain Update
Rain UpdateAgrowon

Koyna Dam : कोयनेसह अलमट्टीचा विसर्ग वाढविला

Dam Water Update : कोल्हापूर, सांगली, सातारा ः कोयना, अलमट्टी धरणांतून विसर्ग वाढवत कृष्णा नदीची फुग कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोयना धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरू आहे.
Published on

Kolhapur News : कोयना, अलमट्टी धरणांतून विसर्ग वाढवत कृष्णा नदीची फुग कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोयना धरणाच्‍या पाणलोट क्षेत्रात मोठा पाऊस सुरू आहे. यामुळे कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग १०५० क्‍युसेकवरून २१०० क्युसेक करण्‍यात आला.

याच वेळी कर्नाटकातील अलमट्टी धरणातील पाण्याचा विसर्ग ही दुपारी चार वाजेपासून तब्बल १ लाख ७५ हजार क्‍युसेकपर्यंत वाढविण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून पाणी मोठ्या प्रमाणात कर्नाटकात जात असल्याने कोल्हापूर जिल्‍ह्यातील शिरोळ तालुक्यासह, सांगली व सातारा जिल्‍ह्यांत पूरस्‍थिती निर्माण झाली नाही.

सांगली जिल्ह्यातील आयर्विन पुलाची इशारा पातळी ४० फूट आहे. तर धोका पातळी ४५ फूट आहे. तिथे गुरुवारी (ता. २७) दुपारी दोन १८.९ इंच फूट पाणी आहे. कृष्णा पूल कराडची धोका पातळी ५५ फूट आहे. याठिकाणी ११ फूट २ इंचांवर पाणी आहे.

Rain Update
Sindhudurg Rain Update : सिंधुदुर्गमध्ये नद्यांच्या पाणीपातळीत वाढ

सांगली जिल्ह्यातील भिलवडी पुलाची धोका पातळी ५३ फूट आहे तेथे १८ फूट ०५ इंच पाणी आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधारा धोकापातळी ५८ फूट आहे. तेथील पाणीपातळी ३८ फूट ०४ इंच इतकी झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची धोकापातळी ४३ फूट आहे, तेथे ४० फूट ६ इंच पाणी आहे.

Rain Update
Monsoon Rain : यंदाचा जुलै विक्रमी पावसाचा

कोयना धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली. हवामान विभागाने पुढचे २४ तास ‘रेड अलर्ट’ देण्यात आला आहे. यामुळे गुरुवारी (ता. २७) दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या पायथ्याशी विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात आले. यातून २१०० क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग सुरू झाला.

यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे. वारणा धरणाच्या विद्युत निर्मिती प्रकल्पातून १६३० क्युसेक व वक्राकार दरवाज्यातून ५१५० क्यूसेक विसर्ग असा एकूण ६७८० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

गगनबावड्यात सर्वाधिक ११६ मिलिमीटर पाऊस

दरम्यान, कोल्हापूरसह सातारा, सांगली जिल्ह्यांतही बुधवारी सायंकाळपासून पुन्हा पावसाने सुरुवात केली. गगनबावड्यात सर्वाधिक ११६ मिलिमीटर पाऊस झाला. राधानगरीचे चार दरवाजे अद्याप सुरू असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत किंचित वाढ सुरू होती. सातारा जिल्‍ह्यातील कोयना परिसर वगळता अन्य ठिकाणी हलका पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यात गुरुवारी (ता. २७) सर्व तालुक्यात पावसाच्या हलक्‍या सरी सुरू होत्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com