Gram Panchyat Election: ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेस ३० जानेवारीपासून प्रारंभ

राज्य निवडणूक आयोगाने याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार ३० जानेवारी ते २५ एप्रिलपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. एप्रिलमध्ये अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल.
Grampanchyat News
Grampanchyat NewsAgrowon

सोलापूर : जानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १०९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा (Gram Panchyat Ward Formation) कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या ३० जानेवारीपासून प्रभाग रचनेच्या प्रक्रियेला सुरवात केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) याबाबतची अधिसूचना जाहीर केली आहे. त्यानुसार ३० जानेवारी ते २५ एप्रिलपर्यंत हा कार्यक्रम असणार आहे. एप्रिलमध्ये अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल.

३० जानेवारी रोजी त्या त्या तालुक्याच्या तहसीलदारांनी गुगल अर्थवरून नकाशे तयार करावेत. त्या नकाशानुसार गावातील तलाठी आणि ग्रामसेवकांनी संयुक्तरीत्या पाहणी करून प्रभागाच्या हद्दी ठरवाव्यात.

७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग रचनेच्या सीमा निश्चित कराव्यात. तहसीलदारांनी यासाठी समिती नेमावी. त्या समितीसह गटविकास अधिकाऱ्यांना सोबत घेऊन १५ फेब्रुवारीपर्यंत या प्रभाग रचनेची पडताळणी करावी.

२१ फेब्रुवारीपर्यंत ही प्रभाग रचना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी सादर करावी.

३ मार्चपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रभाग रचनेचा नमुना ब ची संक्षिप्त तपासणी करून त्यामध्ये आवश्यक दुरुस्ती करून त्यास अंतिम मान्यता द्यावी.

१४ मार्च रोजी ही प्रभाग रचना तहसीलदारांनी जाहीर करावी. १७ मार्चपर्यंत नमुना ब मधील प्रभाग रचनेला प्रसिद्धी दिल्यानंतर त्यावर हरकती आणि सूचना तहसीलदारांनी मागवून घ्याव्यात.

२४ मार्चपर्यंत यावर हरकती आणि सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यावर २८ मार्चपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावण्या घ्याव्यात.

Grampanchyat News
Gram Panchayat Election : जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध

११ एप्रिलपर्यंत आलेल्या हरकती, सूचनांवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी अंतिम अभिप्राय नोंदवून निर्णयासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेसाठी पाठवून द्यावा.

जिल्हाधिकाऱ्यांनी तपासून १७ एप्रिलपर्यंत उपविभागीय अधिकाऱ्यांना पाठवून दिलेली प्रभाग रचना निवडणूक आयोगाला सादर करावी. २५ एप्रिलपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम मान्यता दिलेल्या प्रभाग रचनेला जाहीर प्रसिद्धी द्यावी.

मुदत संपणाऱ्या तालुकानिहाय ग्रामपंचायती

करमाळा - १६

माढा - १४

बार्शी - ५

मोहोळ - २

पंढरपूर - ३

माळशिरस - १०

सांगोला - ४

मंगळवेढा - २७

दक्षिण सोलापूर - १०

अक्कलकोट - १८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com