Khandesh Rain : खानदेशात अनेक भागांत पावसाची प्रतीक्षा

Khandesh Monsoon : खानदेशात अनेक गावांत किंवा भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक प्रकल्प कोरडेच आहेत. त्यात धुळ्यातील पश्‍चिम भागात कमी पावसाने दुबार-तिबार पेरणी करावी लागली, परंतु पाऊस हवा तसा न आल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
Farming
FarmingAgrowon
Published on
Updated on

Khandesh Rain News : जळगाव ः खानदेशात अनेक गावांत किंवा भागात समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक प्रकल्प कोरडेच आहेत. त्यात धुळ्यातील पश्‍चिम भागात कमी पावसाने दुबार-तिबार पेरणी करावी लागली, परंतु पाऊस हवा तसा न आल्याने शेतकरी चिंतेत आहेत. महिनाभर रिपरिप पाऊस अनेक भागांत झाला. यात तण वाढले. पण या काळात धुळे तालुक्यातील पश्‍चिम भाग व साक्रीच्या पूर्व भागात कमी पाऊस आहे.

अनेकांनी दुबार पेरणी केली. काहींना तिबार पेरणीदेखील करावी लागली आहे. यातच मागील पाच ते सहा दिवसांपासून खानदेशात काही भागांचा अपवाद वगळता पाऊस आलेला नाही. हलक्या, मुरमाड जमिनीत कमी पावसामुळे किंवा पावसात सातत्य नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कडधान्यात मूग, उडदाची पेरणी कमी झाली आहे.

कापूस पीक जेमतेम एक महिन्याचे कोरडवाहू क्षेत्रात झाले आहे. तसेच मका, ज्वारी, सोयाबीन, तूर ही पिकेही आहेत. यात हलक्या, मुरमाड जमिनीत पावसाची नितांत गरज पिकांना आहे. चार ते पाच दिवस पाऊस न आल्याने अनेक पूर्वहंगामी (बागायती) कापूस पीकधारकांनी पिकाला कृत्रीम जलसाठ्यांद्वारे पाणी देण्यास सुरुवात केली आहे.

Farming
खानदेशात अनेक भागांत पावसाची हजेरी

जळगाव जिल्ह्यात जामनेर, बोदवड, भुसावळ, पारोळा, भडगाव, चाळीसगाव, अमळनेर या भागात हलकी, मुरमाड जमीन अधिक आहे. कमाल क्षेत्र किंवा पिके कोरडवाहू आहेत. धुळ्यातही साक्री, धुळे, शिंदखेडा भागांत हलकी व मुरमाड जमीन आहे. जलसाठेही या भागांत कमी आहेत. नंदुरबारात नवापूर, नंदुरबार व शहादा तालुक्यांतील काही भागांत हलकी जमीन आहे.

या क्षेत्रात पावसाची गरज आहे. एकूण १४ लाख हेक्टरवर खानदेशात खरिपातील पिकांची पेरणी केली जाते. यात यंदा ९३ टक्के पेरणी खानदेशात झाली आहे. उर्वरित क्षेत्र नापेर आहे. या क्षेत्रातील पिकांना पावसाची गरज आहे. कांदेबाग केळी पिकातही निसवण, घडांची वाढ होत आहे. पाऊस आल्यास केळीलाही लाभ होत असतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com