Parag Desai
Parag Desai Agrowon

Wagh Bakri Owner Death : वाघ बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई यांचे निधन

Wagh Bakri Director Parag Desai Dies : वाघ बकरी ग्रुपचे संचालक पराग देसाई यांचे वयाच्या ४९ व्या वर्षी निधन झाले
Published on

Parag Desai Death News : वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे काल रात्री उशिरा निधन झाले. ते 49 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात एका अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यांच्यावर अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

Parag Desai
Crop Insurance News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! फळ बागायतदारांनाही पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा

वाघ बकरी ग्रुपची स्थापना १८९२ मध्ये नारनदास देसाई यांनी केली. आपल्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळणाऱ्या पराग देसाई यांची ही चौथी पिढी आहे. ते वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. 15 ऑक्टोबर रोजी पराग देसाई यांचा रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांने पाठलाग केला. यावेळी पळताना पडल्याने त्यांना ब्रेन हॅमरेज झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. अनेक दिवस ते व्हेंटिलेटरवर होते.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parag Desai
Tea Powder Production : भारताची चहा पावडर खालच्या दर्जाची, अनेक देशांनी दाखवली नापसंती, ३० टक्क्यांनी घसरली निर्यात

पराग देसाई यांना गेल्या आठवड्यात अहमदाबाद रे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खरे तर काही काळापूर्वी त्यांच्या राहत्या घरी झालेल्या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर उपचार सुरू होते. रविवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला.

पराग आणि त्याचा चुलत भाऊ पारस 1990 पासून त्यांचा कौटुंबिक व्यवसाय सांभाळत होते. परागने अमेरिकेतील लाँग आयलँड विद्यापीठातून एमबीए केले आहे. वाघ बकरी टी ग्रुपचे ते कार्यकारी संचालक होते. सेल्स, मार्केटिंग इत्यादी कंपनीच्या जबाबदाऱ्या संभाळत होते.

वाघ बकरी चहा समूह हा त्याच्या प्रीमियम चहासाठी प्रसिद्ध आहे. ही गुजरात स्थित कंपनी असून तिची उलाढाल २ हजार कोटींहून अधिक आहे. चहाचे वितरण सुमारे 50 दशलक्ष किलोग्रॅम आहे. कंपनी सुमारे 60 देशांमध्ये निर्यात करते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com