Election
ElectionAgrowon

Gram Panchayat Election : अकोला जिल्ह्यात २६५ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागातील राजकारण तापले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोचली असून रविवारी (ता.१८) मतदान होणार आहे.

अकोलाः गेल्या १५ दिवसांपासून ग्रामीण भागातील राजकारण तापले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची (Gram Panchayat Election) रणधुमाळी शिगेला पोचली असून रविवारी (ता.१८) मतदान होणार आहे. तर मंगळवारी (ता.२०) मतमोजणीतून निकाल बाहेर येतील. जिल्हयात २६५ ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. मतदानाची सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चालणार आहे.

Election
Election : सहा आठवड्यांत निवडणूक पूर्ण करा

जिल्ह्यात आता तेल्हारा तालुक्यात २३, अकोट ३६, मूर्तिजापूर ५१, अकोला ५४, बाळापूर २६, बार्शीटाकळी ४७ तर पातूर२८ अशा एकूण २६५ ग्रामपंचायतींमध्ये आता निवडणूक होणार आहे. यात निवडणूक होणाऱ्या प्रभागांची संख्या ६७९ असून त्यातून १४७४ सदस्यांची निवड व्हावयाची आहे. एकूण ५७१ सदस्य हे बिनविरोध ठरले आहेत. २९ ठिकाणी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. जिल्ह्यात एकूण बिनविरोध प्रभागांची संख्या १३८ झालेली आहे. सरपंच वगळता ५ ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. त्यात तेल्हारा व अकोट तालुक्यातील प्रत्येकी एक व अकोला तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

Election
Gram Panchayat Election : राज्यात गावकारभाऱ्यांच्या निवडीसाठी आज मतदान

सरपंचपदांसाठी २५८ ठिकाणी निवडणूक

सरपंचपदासाठी २५८ जागांवर निवडणूक होणार आहे. जिल्ह्यात एकूण चार ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार यापूर्वीच बिनविरोध ठरले असून चार ठिकाणी सरपंचपदाकरिता एकही उमेदवारी अर्ज प्राप्त झालेला नाही. एकंदर सरपंच व सदस्य असे मिळून १६९५ जण उमेदवारीच्या रिंगणात आहेत.

तीन लाख ८ हजार ३१७ मतदार बजावणार हक्क

या निवडणुकीत एकूण तीन लाख ८ हजार ३१७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात एक लाख ६१ हजार ६५९ पुरुष, तर एक लाख ४६ हजार ६५४ महिला व ४ इतर मतदारांचा समावेश आहे. तेल्हारा तालुक्यात ३११३४, अकोट ५२०७९, मूर्तिजापूर ५८६८४, अकोला ५६९२४, बाळापूर २७१८५, बार्शीटाकळी ४८३३२, पातूर ३३९६२ मतदार आहेत. या निवडणुकीसाठी एकूण मतदान केंद्र ८३२ असून त्यातील संवेदनशील मतदान केंद्र १७९ आहेत. संवेदनशील मतदान केंद्रात तेल्हारा तालुक्यात ७, अकोट ४२, मूर्तिजापूर ५१, अकोला ९ , बाळापूर १२, बार्शीटाकळी ३३, पातूर २५ केंद्रांचा समावेश आहे.

येथे होणार मतमोजणी

मंगळवारी (ता.२०) तेल्हारा नवीन तहसिल कार्यालय, गाडेगाव रोड, अकोट नवीन तहसिल इमारत, पोपटखेड रोड, मूर्तिजापूर नवीन शासकीय धान्य गोदाम, अकोला शासकीय धान्य गोदाम, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, बाळापूर शासकीय धान्य गोदाम, बार्शीटाकळी पंचायत समिती सभागृह, आणि पातूर येथे तहसिल कार्यालयात मतमोजणी केली जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com