‘वसाका’ सुरू होण्याच्या हालचालींना वेग

वसाका व्यवस्थापन, कामगार युनियन व अवसायक यांच्यात गुरुवारी (ता. १०) त्रिपक्षीय सामंजस्य करार झाल्याने वसाका कारखाना सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Accelerate the movement to start ‘Vasaka’
Accelerate the movement to start ‘Vasaka’

देवळा, जि. नाशिक : वसाका व्यवस्थापन, कामगार युनियन व अवसायक यांच्यात गुरुवारी (ता. १०) त्रिपक्षीय सामंजस्य करार झाल्याने वसाका कारखाना सुरू होण्याच्या हालचालींना वेग आला आहे. व्यवस्थापन मंडळाने परिपत्रकाद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत काही कर्मचारी गुरूवारी (ता. ११) सकाळी प्रत्यक्ष कामावर हजर झाल्याने सन २०२०-२१ गळीत हंगाम सुरू होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

धाराशिव साखर कारखाना संचालित वसाका साखर कारखाना चालू व्हावा यासाठी प्रयत्न सुरू होते. या पार्श्वभूमीवर आमदार डॉ. राहुल आहेर, अवसायक राजेंद्र देशमुख, धाराशिवचे अध्यक्ष अभिजित पाटील व संचालक मंडळ तसेच कामगार युनियनचे पदाधिकारी अशोक देवरे, कुबेर जाधव व इतर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यात कर्मचारी यांचा प्रोव्हीडंट फंड, मागील देणी, प्रतिवर्षाची पगारवाढ, सुट्या व रजा, सेवानिवृत्ती वय आदी बाबींवर चर्चा करून करार झाला. २०१८-१९मध्ये थकीत वेतनावरून वाद झाल्याने गाळप हंगाम अर्धवट सोडावा लागला होता. तर २०१९-२० चा गळीत हंगाम झालाच नाही.

अखेर कामगार युनियन नेते व भाडेकरू संस्था यांच्यात आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत बैठक होऊन प्रलंबित असलेल्या करारावर चर्चा होऊन अवसायक राजेंद्र देशमुख यांच्या समोर यशस्वी तोडगा काढण्यात आल्याने आशा पल्लवित झाल्या आहेत. वसाका कार्यस्थळावर झालेल्या या बैठकीत संचालक संदीपान खारे, संतोष कांबळे, आबासाहेब खारे, संजय खरात उपस्थित होते.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करत वसाका सुरू होण्याच्या दृष्टीने सामंजस्य करार हा मैलाचा दगड आहे. वसाका व्यवस्थापन व कामगार युनियन यांच्यात कोणताही वाद होऊ न देता वसाकाला पुनर्वैभव मिळवून देणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे.     - आमदार डॉ. राहुल आहेर, चांदवड.

वसाका चालू होणे हा कामगाराच्या दृष्टीने जीवनमरणाचा प्रश्न होता.आमदारांच्या मध्यस्थीने कामगार व व्यवस्थापन यांच्यात यशस्वी तडजोड झाली आणि संघर्षाला व प्रयत्नांना यश मिळाले याचा आनंद आहे. वसाकासाठी कामगारांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. - अशोक देवरे, अध्यक्ष, वसाका कामगार युनियन

वसाका गतिमान करण्यासाठी आमचा प्रत्येक घटक प्रयत्नशील आहे. शेतकरी,  कामगार, सभासद याचे सहकार्य आम्हास अपेक्षित आहे. - अभिजित पाटील, अध्यक्ष, धाराशिव समूह

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com