Vasant Sugar Mill
Vasant Sugar MillAgrowon

वसंत कारखाना भाडेतत्त्वावर देणार

उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर दिला जाणार आहे. कारखान्याच्या साइटवर झालेल्या सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वेळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखाना (Vasant Sugar Mill) भाडेतत्त्वावर (Mill On Rent) दिला जाणार आहे. कारखान्याच्या साइटवर झालेल्या सभेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. या वेळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

थकीत कर्जाच्या कारणावरून वसंत सहकारी साखर कारखाना अवसायनात निघाला होता. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून बंद असलेल्या या कारखान्याची कर्ज वसुलीसाठी विक्री न करता भाडेतत्त्वावर देण्यात यावा, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह (Sugarcane Farmer) सभासद, कामगार यांच्याकडून होत होती.

दरम्यान, या मागणीची दखल घेत जिल्हा बँकेने देखील हा कारखाना विक्री न करता भाडेतत्त्वावर दिला जाईल, असे आश्‍वासन दिले होते. सभासद, कामगार, सेवानिवृत्त कामगार व ऊस उत्पादक यांच्या बैठकीत देखील पोफाळी येथील वसंत सहकारी कारखाना भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेण्यात आला.अवसायकांनी ही सभा बोलावली होती.

या वेळी आमदार नामदेव ससाणे, माजी आमदार राजेंद्र नजरधने, विजयराव खडसे, चिंतागराव कदम, तातूजी देशमुख, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन भुतडा, दत्तराव शिंदे, तालुका शिवसेना प्रमुख सतीश नाईक, नितीन माहेश्वरी, सविता कदम, भीमराव चंद्रवंशी, शंकर तालंगेकर, व्ही. एम. पतंगराव, गणेश घोडेकर, गजानन सोळंके, बालाजी वानखडे, विठ्ठल चव्हाण, संतोष जाधव, उत्तम लेवल उपस्थित होते.

भाडे तत्त्वावर घेण्यासाठी चार कंपन्या उत्सुक

वसंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात काय प्रयत्न केले? काय अडचणी आहेत? यावर चर्चा करण्यासाठी सभा बोलावण्यात आली होती. यामध्ये अवसायक योगेश गोतरकर यांनी सविस्तर माहिती दिली. दरम्यान कारखाना भाडेतत्त्वावर चालण्यासाठी चार कंपन्या उत्सुक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com