Irrigation Project : ‘वरखेडे’च्या वितरण प्रणालीला हवी गती

Agriculture Irrigation : चाळीसगाव व भडगाव तालुक्यांना वरदान ठरलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज (मध्यम) प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झालेले असून, मात्र वितरण प्रणालीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही.
Irrigation
IrrigationAgrowon

Jalgaon News : चाळीसगाव व भडगाव तालुक्यांना वरदान ठरलेल्या वरखेडे- लोंढे बॅरेज (मध्यम) प्रकल्पाचे मुख्य धरणाचे काम पूर्ण झालेले असून, मात्र वितरण प्रणालीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. वितरण प्रणाली पूर्ण झाल्यास अनेक गावांना लाभ होणार आहे.

हा प्रकल्प गिरणा नदीवर, मौजे वरखेडे बुद्रुक गावापासून १ किलोमीटर व चाळीसगाव शहरापासून २५ किलोमीटर अंतरावर आहे. चाळीसगाव तालुक्यातील २० व भडगाव तालुक्यातील ११ अशा एकूण ३१ गावांतील ७ हजार ५४२ हेक्टर क्षेत्राला फायदा होणार आहे.

राज्य सरकारने १ मार्च १९९९ या वर्षी मंजुरी मिळाली आणि २०१३ पासून या प्रकल्पाचे काम सुरू झाले. त्यानंतर या प्रकल्पाला दरसूचीनुसार वेळोवेळी निधी मिळत गेला. सुरुवातीला सन १९९७/९८ ला ७५.६४ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यानंतर २००७/०८ मध्ये त्या प्रकल्पाला १८ फेब्रुवारीला प्रशासकीय मान्यतेमध्ये वाढ होऊन २६४ रु कोटी मिळाले.

Irrigation
Takari Irrigation Scheme : ‘ताकारी’मुळे ओढे-नाले तुडुंब

त्यानंतर २०१३/१४ मध्ये ९ मार्च २०१८ मध्ये ५२६ कोटी ६४ लाख रु प्राप्त झाले. २० सप्टेंबर २०१९ रोजी या प्रकल्पाला ९५ हेक्टर वन जमिनीस, पर्यावरण व वन मंत्रालयाची मान्यता मिळाली. केंद्रीय जल आयोगाने १२ मार्च २०१८ च्या बैठकीत ५२६ कोटी ६४ लाख रुपये प्राप्त मिळाले. त्यानंतर नाबार्ड अंतर्गत अर्थसाह्य मिळाले. प्रकल्पाला चाळीसगाव तालुक्याचे तत्कालीन आमदार राजीव देशमुख, उन्मेष पाटील, मंगेश चव्हाण या तिन्ही जणांनी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतल्याचे दिसत आहे.

Irrigation
Agriculture Irrigation : सिमेंट बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मिळणार शाश्‍वत पाण्याचे माध्यम

या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने २०१७ मध्ये कामाला वेग आला. त्या वेळचे तत्कालीन आमदार व विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकारच्या बळिराजा संजीवनी योजनेअंतर्गत समावेश करण्यात आला. त्या प्रकल्पाचा कामाचा वेग वाढला. या प्रकल्पाचे २२ वर्षांमध्ये सुद्धा काम पूर्ण न झाल्याने खर्चामध्ये सुद्धा वेळोवेळी वाढ झाली असल्याचे दिसत आहे.

शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी या प्रकल्पाचे काम रात्रंदिवस काम करून, आता या प्रकल्पाचे काम पूर्णत्वास आलेले आहे. या प्रकल्पाचा एकूण प्रस्तावित पाणीसाठा ३५.६८ दलघमी (१.२६ टीएमसी) व प्रस्तावित जिवंत साठा ३४.७७ दलघमी (१.२३ टीएमसी) इतका आहे.

बंदिस्त वितरण प्रणाली करणार

राज्य सरकारचे बंदिस्त नलिका वितरण प्रणालीबाबत धोरण असल्याने, त्या प्रस्तावास, महामंडळाच्या २३ जून २०२२ च्या पत्रानुसार,मान्यता प्रदान करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे, शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होण्यासाठी लवकरात लवकर शेती पर्यंत पाणी पोहण्यासाठी, बंदिस्त पाइपलाइन योजनेला मूर्त स्वरूप देणे गरजेचे आहे. तसेच या प्रकल्पामुळे आजूबाजूच्या पंचक्रोशीतील, परिसरातील पाणीपातळीत वाढ होणार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com