Varandha Ghat : वरंधा घाट तीन महिने राहणार बंद

Land Sliding : पंढरपूर- महाड राज्य महामार्ग हद्दीतील भोर वरंध घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे.
Varandha Ghat
Varandha GhatAgrowon
Published on
Updated on

Pune News : पंढरपूर- महाड राज्य महामार्ग हद्दीतील भोर वरंध घाटात अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शनिवार (ता. १)पासून सर्वप्रकारच्या अवजड वाहनांना या मार्गावर बंदी करण्यात आली आहे. परंतु भोर प्रशासनाकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. त्यामुळे भोरमार्गे जाणाऱ्या वाहनांची आता मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.

Varandha Ghat
Agriculture Department : अनधिकृत निविष्ठांकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष

रायगडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या मार्गावर १ जुलै ते ३० सप्टेंबरदरम्यान अवजड वाहनांना बंदी करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. तसे पत्र रायगड जिल्हा वाहतूक शाखेच्या सहायक पोलिस निरीक्षकांनी महाड एमआयडीसी पोलिस ठाण्याला दिले आहे. अवजड वाहने कोणत्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येतील, याबाबत पडताळणी करून महाड एमआयडीसी

Varandha Ghat
Agriculture Inputs : अनधिकृत निविष्ठा विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

पोलिस ठाण्याकडून अभिप्राय जिल्हा वाहतूक शाखेकडून मागविण्यात आला आहे. महाड एमआयडीसी पोलिसांकडून घाट बंद असल्याचा फलक राजेवाडी येथील भोर फाट्यावर लावण्यात आला आहे; परंतु भोर प्रशासनाकडून याबाबत काही हालचाली केलेल्या नाहीत.

एसटी बसवर परिणामाची शक्यता

भोर हद्दीतील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम झाल्याने रस्ता चांगला आहे. त्यामुळे या वर्षी पावसाळ्यात रस्ता चालू राहील, असे वाटत होते; परंतु आता मार्ग बंद केल्याने कोकणात जाणाऱ्या महामंडळाच्या एसटी बस बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याही पावसात प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com