Vaibhav wadi -Kolhapur Railway : वैभववाडी -कोल्हापूर रेल्वेमार्गाला ग्रीन सिग्नल, तब्बल ३ हजार ४११ कोटींच्या खर्चाची शिफारस

PM Gatishakti : पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या बैठकीत याबाबत शिफारस करण्यात आली.
Vaibhav wadi -Kolhapur Railway
Vaibhav wadi -Kolhapur Railwayagrowon
Published on
Updated on

Kokan -kolhapur Railway : मागच्या ७ वर्षांपासून रखडलेल्या वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गासाठी तीन हजार ४११ कोटी १७ लाखांच्या खर्चास शिफारस देण्यात आली आहे.

पीएम गतीशक्ती अंतर्गत ५३ व्या राष्ट्रीय नियोजन गटाच्या बैठकीत याबाबत शिफारस करण्यात आली. त्यामुळे वैभववाडी -कोल्हापूर या १०७ किलोमीटरचा रेल्वेमार्गाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.

पीएम गतीशक्ती अंतर्गत तीन रेल्वे प्रकल्प आणि तीन रस्ते प्रकल्पांचा समावेश आहे. याचा मुख्य उद्देश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या वैभववाडी- कोल्हापूर रेल्वे मार्ग हा आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या शहरी आणि रेल्वे पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी या प्रकल्पाचा उपयोग होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मागच्या दोन दिवसांपूर्वी गुरूवारी (ता.१०) उद्योग आणि व्यापार प्रोत्साहन विभागाच्या अंतर्गत (एनपीजी) लॉजिस्टिक्स सचिव सुमिता दावरा यांच्या अध्यक्षतेखाली दिल्ली येथे बैठक पार पडली. यावेळी २८ हजार ८७५.१६ कोटी रुपयांच्या सहा प्रकल्पांचे मूल्यमापन करण्यात आले होते. यात वैभववाडीमार्गाचा समावेश करण्यात आला.

दरम्यान, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गामुळे उद्योगांव्यतिरिक्त महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसाठी औष्णिक कोळशाच्या वाहतुकीला मदत मिळणार आहे. या भागातील पर्यटन आकर्षणाव्यतिरिक्त उद्योगांचे नव्या पायाभूत सुविधांच्या कनेक्टिव्हिटी संदर्भात मूल्यमापन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Vaibhav wadi -Kolhapur Railway
Waterfalls In Kolhapur : कोल्हापुरातील धबधब्यांवर जाण्याची बंदी उठवली, विकेंडला करा प्लॅन

वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कच्चा, पक्का अशा दोन्ही प्रकारचे शेतीमाल बंदरापर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. तर कोकणातील खनिजासह अन्य मालाची पश्चिम महाराष्ट्रात वाहतूकीसाठी मदत होणार असल्याने कोकण व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळू शकते. सध्या पश्चिम महाराष्ट्रातील शेती उत्पादित मालाची रस्ते मार्गाने कोकणात वाहतूक होते.

कोकणातील खनिजांची वाहतूकही रस्ते मार्गानेच होते. कोल्हापूर- वैभववाडी रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील शेतीमालाची बंदरापर्यंत वाहतूक कमी खर्चिक आणि सुलभ होणार आहे. शिवाय कोकणातील मालवाहतूक करणे सोयीस्कर ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com