Cooperative Milk Union : राजारामबापू दूध संघ संचालकपदी विनायक पाटील

येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या संचालक मंडळातील रिक्त झालेल्या पदावर संघाचे माजी अध्यक्ष विनायक पाटील (ताकारी) यांची बिनविरोध निवड झाली.
Cooperative Milk Union
Cooperative Milk UnionAgrowon

इस्लामपूर, जि. सांगली : येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या (Cooperative Milk Union) संचालक मंडळातील रिक्त झालेल्या पदावर संघाचे माजी अध्यक्ष विनायक पाटील (ताकारी) यांची बिनविरोध निवड झाली.

Cooperative Milk Union
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

निवडीची सभा जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) पुणे डॉ. महेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पाटील यांना संचालक मंडळावर घेणयाबाबतची सूचना अध्यक्ष नेताजीराव पाटील यांनी केली. उपाध्यक्ष शशिकांत पाटील यांनी अनुमोदन दिले.

राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघाचे कामकाज चालू आहे. संघाचे संचालक मंडळातील सर्वसाधारण मतदारसंघातील एक पद रमेश पाटील यांच्या निधनाने रिक्त झाले होते. निवडीवेळी राजारामबापू बँकेचे अध्यक्ष शामराव पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वाळवा तालुकाध्यक्ष विजय पाटील, बँकेचे संचालक संजय पाटील, संचालक प्रताप पाटील, संग्राम फडतरे, प्रशांत थोरात, बबनराव सावंत, पोपटराव जगताप, सुधीर पाटील उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com