Milk Collection : दूध संकलन केंद्रांवर दहा ग्रॅम अचूकतेचे वजन काटे वापरा

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दूध संकलन केंद्रांवर एक जानेवारीपासून दहा ग्रॅम अचूकतेचे वजन काटे वापरण्यात यावेत, असे आदेश राज्याच्या वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक यांनी दिले आहेत.
Milk Dairy
Milk Dairy Agrowon

तासगाव, जि. सांगली : दूध उत्पादक शेतकऱ्यांचे (Dairy Farmer) होणारे नुकसान टाळण्यासाठी दूध संकलन केंद्रांवर (Milk Collection Center) एक जानेवारीपासून दहा ग्रॅम अचूकतेचे वजन काटे वापरण्यात यावेत, असे आदेश राज्याच्या वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक यांनी दिले आहेत.

Milk Dairy
Milk Production : दूधवाढीसाठी दिले ऑक्सिटोसिन औषध

सध्या दूध संकलन केंद्रांवर १०० ग्रॅम अचूकतेचे वजन काटे वापरले जातात. नव्या निर्णयामुळे दहा मिली पर्यंतचे दुधाचे वजन होणार असल्याने राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचा सरासरी दहा रुपयांचा फायदा होणार आहे.

तासगाव तालुक्यातील शेतकरी कार्यकर्ते जोतिराम जाधव यांनी गेली तीन वर्षे दूध संकलन केंद्रात वापरण्यात येणाऱ्या १०० मिली- ग्रॅम अचूकतेच्या काट्यामुळे होणाऱ्या फसवणुकीबाबत सरकार दरबारी पाठपुरावा सुरू ठेवला होता. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यापासून दुग्धविकास मंत्र्यांपर्यंत या बाबत तक्रारी केल्या होत्या. त्यांच्या तक्रारीची दखल घेत शासनाने स्थापन केलेल्या अभ्यास समितीने केलेल्या शिफारशीवरून वैधमापन शास्त्र विभागाने १० मिली अचूकतेचे वजन काटे दूध संकलन केंद्रावर वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

समजा सध्या एखाद्या दूध उत्पादक शेतकऱ्याने दूध संकलन केंद्रावर दूध घातले, ते दूध ४ हजार ९४९ भरले तर ते दूध ४ लिटर ९०० मिली समजले जाते. वरचे ४९ ग्रॅम वजनात गृहीत धरले जात नाहीत. मात्र आता १० ग्रॅम वजन अचूकता असलेले वजन काटे वापरल्याने हे दूध ४ लिटर ९४० मिली मोजले जाईल. त्यामुळे जादा मोजल्या जाणाऱ्या ४० मिली दुधाचेही पैसे मिळणार आहेत. जे पैसे आतापर्यंत मिळत नव्हते. दररोज होणारे एकूण दूध संकलन पाहता किती प्रचंड नुकसान दूध उत्पादक शेतकऱ्यांचे होते आहे याचा अंदाज येईल.

दहा मिली पर्यंतचे अचूक दूध संकलन करण्याची सक्ती करणारी चिंचणी ही राज्यातील एकमेव ग्रामपंचायत असावी. यामुळे दूध उत्पादकांचे होणारे नुकसान टळणार आहे.
प्रदीप पाटील, संचालक, गणेश दूध केंद्र, चिंचणी
शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे होणारी फसवणूक या निमित्ताने टळली असून मिल्को टेस्टर बाबतही शासनाने ठोस धोरण आखावे.
जोतिराम जाधव, शेतकरी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com