Banana Farming : आदर्श शेती पध्दतीचा केळीत वापर गरजेचा

Banana Market : केळी पिकात आदर्श शेती पद्धतींचा वापर, निकषांनुसार गुणवत्ता, सुधारित तंत्रज्ञान, लेबल क्लेम व रासायनिक अंशांचे व्यवस्थापन व बाजारपेठ पद्धती यांचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे.
Banana
BananaAgrowon

Pune News : केळी पिकात आदर्श शेती पद्धतींचा वापर, निकषांनुसार गुणवत्ता, सुधारित तंत्रज्ञान, लेबल क्लेम व रासायनिक अंशांचे व्यवस्थापन व बाजारपेठ पद्धती यांचे योग्य नियोजन महत्त्वाचे आहे. ते झाल्यास पुणे जिल्ह्यातील जुन्नर, नारायणगाव पट्ट्यात केळी शेतीचे क्लस्टर तयार होण्यास वाव मिळेल, असा सूर तज्ज्ञांनी व्यक्त केला.

Banana
Banana Cultivation Management : केळी मृग बाग लागवडीचे नियोजन

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ व डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी यांच्यातर्फे नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) शहरी अन्न पथदर्शक प्रकल्पाअंतर्गत ‘केळी पिकाची उत्तम कृषी पद्धती’ (गॅप) प्रशिक्षण शुक्रवारी (ता.१२) झाले. त्यावेळी विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना झाले.

अध्यक्षस्थानी ‘केव्हीके’चे अध्यक्ष अनिल मेहेर होते. अखिल ‌भारतीय भाजीपाला संघाचे अध्यक्ष श्रीराम गाढवे, ‘रोमिफ’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत नाईकवाडी, ॲग्रोवन’चे उपमुख्य उपसंपादक मंदार मुंडले, सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील तज्ज्ञ डॉ. संतोष चव्हाण, केळी तज्ज्ञ शैलेंद्र जाधव, जितेंद्र जगताप, शाश्वत शेती फाउंडेशनचे शिवाजी कांबळे, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे सहायक व्यवस्थापक जे. बी. राखोंडे, सरपंच तुषार वामन, ‘डेक्कन व्हॅली’ कंपनीच्या नीलम बेल्हेकर, सुनील वामन, ‘आत्मा’चे सूर्यकांत विरणक, अजय बेल्हेकर आदी उपस्थित होते.

Banana
Banana Cultivation : कसे असावे केळी मृग बाग लागवडीचे नियोजन?

यावेळी डॉ. नायकवाडी यांनी सेंद्रिय कर्बाचे महत्त्व, त्याचे नियोजन, अन्नद्रव्ये व्यवस्थापन व पिकांमधील प्रतिकारक्षमता, सेंद्रिय शेती व रासायनिक अवशेषांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.

तर डॉ. संतोष चव्हाण यांनी बांधावरील प्रयोगशाळा, त्या अंतर्गत ट्रायकोडर्मा बुरशीनाशकाचे महत्त्व, त्याची निर्मिती शेतकरी स्तरावर कशी करायची याबाबत सविस्तर माहिती व काही यशस्वी उदाहरणे विशद केली.

मंदार मुंडले यांनी रसायनांचे पीएचआय, कमाल अवशेष मर्यादा (एमआरएल), रेसीड्यू फ्री शेतीची शास्त्रीय तत्त्वे, निकष, व्यवस्थापन, आवश्‍यक प्रमाणपत्रे याबाबत मार्गदर्शन केले. शैलेंद्र जाधव यांनी केळीमध्ये उच्च गुणवत्ता प्राप्त करण्यासाठी आदर्श व्यवस्थापन, लागवड पद्धती. फ्रूट केअर तंत्रज्ञान, साठवणूक नियोजन, वाहतूक व बाजारपेठ याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com