Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊस

चक्रीवादळाचा प्रभाव जिल्ह्यात रविवार (ता.११) पासून जाणवत आहे. जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. सोमवारी (ता.१२) पहाटे चार वाजल्यापासून पावसामध्ये वाढ झाली आहे.
Rain Update | Sindhudurg Rain | Cyclone
Rain Update | Sindhudurg Rain | CycloneAgrowon
Published on
Updated on

सिंधुदुर्गनगरी: चक्रीवादळाचा (Cyclone) प्रभाव जिल्ह्यात रविवार (ता.११) पासून जाणवत आहे. जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाच्या (Rainfall) सरी कोसळत आहेत. सोमवारी (ता.१२) पहाटे चार वाजल्यापासून पावसामध्ये वाढ झाली आहे. ढगाळ वातावरण (Cloudy Weather), पाऊस यामुळे आंबा, काजू बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. आंबा, काजू बागांना आलेला मोहोर काळवंडण्याची शक्यता आहे.

Rain Update | Sindhudurg Rain | Cyclone
Weather Update : हवामान बदलामुळे पावसाची शक्यता

जिल्ह्याच्या सर्व भागात पावसाचे वातावरण आहे. काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. १५ डिसेंबरपर्यंत हा प्रभाव जाणवेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Rain Update | Sindhudurg Rain | Cyclone
Weather Update : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकणात पावसाची शक्यता

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे चक्रीवादळात रूपांतर झाले. हे चक्रीवादळ चेन्नई किनारपट्टीला धडकल्यानंतर तामिळनाडूसह अनेक भागांत फटका बसला आहे. दरम्यान या चक्रीवादळाने रविवारी पहाटेपासून जिल्ह्यात पावसाचे वातावरण तयार केले. कोणत्याही क्षणी पाऊस पडेल, अशी स्थिती होती.

दरम्यान, रविवारी जिल्ह्याच्या काही भागात अवकाळी पाऊस झाला. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. वैभववाडी, कणकवली, सावंतवाडी, कुडाळ तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहिला. जिल्ह्यात सर्वत्र पावसाचे वातावरण आहे. काही भागात पावसाच्या सरी अधूनमधून कोसळत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com