Unseasonal Rain : अवकाळी पाऊस, गारपिटीचा वऱ्हाडात पुन्हा तडाखा

वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी वादळी पाऊस, गारपीट झाली. वादळामुळे गहू, हरभऱ्यासह संत्रा, कांदा, लिंबू व इतर पिकांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Akola News अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत सलग दुसऱ्या दिवशी वादळी पाऊस, गारपीट (Hailstorm) झाली. वादळामुळे गहू, हरभऱ्यासह संत्रा, कांदा, लिंबू व इतर पिकांचे नुकसान (Crop Damage) झाले. प्रामुख्याने वाशीम जिल्ह्यात सुमारे ४२०० हेक्टर तर अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात १२०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

या भागात शुक्रवार आणि शनिवार असे सलग दोन दिवस अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला. प्रामुख्याने शनिवारी (ता. १८) वाशीम जिल्ह्यात मंगरूळपीर, वाशीम, मालेगाव, रिसोड, मानोरा, कारंजा या सर्वच तालुक्यांमध्ये पावसाचा जोर होता.

मंगरुळपीरसह इतर तालुक्यांत जोरदार गारपीटही झाली. यामुळे एकाच दिवसात सुमारे ४२०० हेक्टरपर्यंत गहू, हरभरा, संत्रा, लिंबू, कांदा, ज्वारी, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले.

सर्वाधिक नुकसान मंगरूळपीर तालुक्यात १४६७ हेक्टरवर झाले. वाशीम तालुक्यात ११३३, रिसोड ६६५, मालेगाव ४७७, मानोरा ३३४, कारंजा ११५ हेक्टरवर नुकसान झाले.

Crop Damage
Crop Damage : दोन जिल्ह्यांत १६ हजार ३५ हेक्टरवर नुकसान

अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात अवकाळीने प्रचंड नुकसान केले. या तालुक्यात ९.९ मिली पावसाची नोंद झाली. यात प्रामुख्याने गहू, हरभरा, भुईमूग, कलिंगड पिकांचे नुकसान झाले.

७६५ शेतकऱ्यांचे १२०० हेक्टरवर नुकसान झाल्याचा अहवाल कृषी विभागाने पाठवला आहे. एक दिवसापूर्वीच जिल्ह्यात पातूर व बार्शीटाकळी तालुक्यात नुकसान झाले होते.

Crop Damage
Crop Damage Survey : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतंची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

बुलडाणा जिल्हयात चिखली, खामगाव, सिंदखेडराजा, मेहकर या तालुक्यांमध्ये पावसाने नुकसान केले. चिखली तालुक्यातील उदयनगर, वैरागडमध्ये जोरदार गारपीट झाली.

यंदाच्या वर्षात खरीप हंगामात पीक काढणीला आले असताना परतीच्या पावसाने प्रचंड नुकसान केले होते.

त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी पिकांची लागवड केली. त्यातच या अवकाळी पाऊस व गारपिटीने नुकसान केले. या नुकसानीचा अहवाल दुपारपर्यंत उपलब्ध झालेला नव्हता.

मी दुसऱ्याचे शेत भाड्याने घेत चार एकरात आधी सोयाबीन पेरणी व आता रब्बीत हरभरा लागवड केली होती. मात्र, अवकाळी पावसामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- किसना खुमकर, शेतकरी, बेलखेड, जि. अकोला

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com