Ramnath Kovind : सामाजिक सहिष्णुतेसाठी विद्यापीठाने पुढाकार घ्यावा

Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण आणि पद्म पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवारी (ता. २२) करण्यात आले होते.
Ramnath Kovind
Ramnath KovindAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाडा ही सामाजिक क्रांतिकारी परिवर्तनाची भूमी आहे. याच भूमीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने शिक्षणाबरोबरच सामाजिक सलोखा आणि सहिष्णुता अबाधित राखण्यासाठी मार्गदर्शक काम करावे, असे प्रतिपादन माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण आणि पद्म पुरस्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन शनिवारी (ता. २२) करण्यात आले होते. या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. विद्यापीठाच्या नाट्यगृहात हा कार्यक्रम पार पडला.

Ramnath Kovind
Agriculture Management : तंत्रज्ञानाच्या आधारे शेती व्यवस्थापन करावे

या सोहळ्यास कुलगुरू प्रा. डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव प्रा. डॉ. भगवान साखळे, तसेच पद्मपुरस्कार प्राप्त शब्बीर सय्यद, गिरीश प्रभुणे, दादासाहेब इदाते, रमेश पतंगे, डॉ. प्रभाकर मांडे यांच्या समवेत कृषितज्ज्ञ श्रीरंग लाड उपस्थित होते. या वेळी पद्मपुरस्कार प्राप्त मान्यवरांचा श्री. कोविंद यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

त्यात फातेमा झकेरिया यांच्यावतीने फरहद जमाल यांनी तर डॉ. यू. म. पठाण यांच्या वतीने आतिक पठाण व श्रीमती अलमास पठाण यांनी, तर डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या वतीने डॉ. निवेदिता पानतावणे यांनी सत्कार स्वीकारला.

Ramnath Kovind
Women Agriculture College : जिजामाता महिला कृषी महाविद्यालय चिपळूणला

श्री. कोविंद म्हणाले, की महाराष्ट्र ही देशाच्या सामाजिक चळवळीची भूमी आहे. याशिवाय देशासाठी सामाजिक, आर्थिक योगदान देण्यात महाराष्ट्र अग्रेसर आहे. भारतीय संस्कृतीत या भूमीचे योगदान अतुलनीय आहे. संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सदैव शिक्षणाला प्राधान्य दिले.

विद्यापीठाने आपल्या संशोधन कार्यातून राष्ट्राच्या उन्नतीला चालना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. श्री. कोविंद यांच्या हस्ते प्रथम विद्यापीठाच्या नूतनीकरण केलेल्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण कोनशिला अनावरणाने करण्यात आले. प्रास्ताविक कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com