Ujani Dam Water Storage: उजनीची पातळी पोहोचली आठवड्यात २५ टक्यांवर

पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण (Ujani Dam) अवघ्या आठवड्याभरातच २५ टक्क्यांवर पोहोचले.
Ujani Dam
Ujani DamAgrowon

सोलापूरः गेल्या चार दिवसांपासून सलगपणे सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेने सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १५) काहीशी विश्रांती घेतली. पण जिल्ह्याच्या अनेक भागांत दिवसभर कधी ऊन, कधी ढगाळ असे वातावरण राहिले. तसेच पुणे जिल्ह्यात पडणाऱ्या पावसावर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण (Ujani Dam) अवघ्या आठवड्याभरातच २५ टक्क्यांवर पोहोचले.

यंदा पावसाने (Monsoon) तब्बल महिनाभर उशिराने हजेरी लावली. गेल्या आठवड्यात शनिवारपासून (ता. ९) जिल्ह्यात अनेक भागात कमी-जास्त प्रमाणात पाऊस होत राहिला. पण त्यानंतरही एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता सलगपणे पावसाची संततधार (Heavy Rainfall) सुरू राहिली. अगदी गुरुवारपर्यंत पावसाची हजेरी कायम होती.

जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ४८० मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे १८८.३० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. कमी-अधिक राहिला, तरी जिल्ह्यात सर्वत्र पाऊस राहिला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. विशेषतः पावसाच्या भरवशावर पेरण्या उरकलेल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. या कालावधीत भीज पावसाचे प्रमाण अधिक राहिले. पण आता विहिरी, नाले, ओढे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. येत्या आठवड्यात पुन्हा पाऊस झाल्यास ती भरण्याची शक्यता आहे.

Ujani Dam
Rain Updates: मराठवाड्यात ५२ मंडलांत अतिवृष्टी

पावसाची उसंत, ढगाळ वातावरण कायम

गेल्या चार दिवसांपासून सलगपणे जिल्ह्यात पाऊस होतो आहे. पण शुक्रवारी (ता. १५) पावसाने काहीशी उसंत घेतल्याचे दिसले. चार दिवसांतून आज सकाळी पहिल्यांदाच सूर्यदर्शन झाले. त्यानंतरही दिवसभर काही भागात हलक्या सरी झाल्या, पण त्यात जोर नव्हता. तर काही बहुतेक भागात नुसतेच कधी ऊन, तर कधी ढगाळ वातावरण राहिले.

Ujani Dam
Rain Updates: नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात दाणादाण

उजनीची पातळी २५ टक्क्यांवर

गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यात पाऊस पडतो आहे. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्यावरच्या बाजूला असलेल्या पुण्याकडील खडकवासलासह १८ धरणांमध्ये आता पुरेसा पाणीसाठा झाला आहे. खडकवासला तर दोन दिवसापूर्वीच शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणातील अतिरिक्त पाणी पुढे उजनी धरणाकडे सोडले जाते आहे. गेल्या आठवड्यापासून हे पाणी सोडले जात असल्याने उणे पातळीत असणारे उजनी धरण अवघ्या आठवड्यातच २५ टक्क्यांवर पोचले आहे.

शुक्रवारीही (ता. १५) दौंडकडून उजनीमध्ये ४३ हजार ९४४ क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग अखंडपणे सुरूच होता. त्यामुळे धरणातील पाणीपातळी ४९२.८१० मीटरपर्यंत पोहोचली. तर एकूण पाणीसाठा ७७.१५ टीएमसी एवढा राहिला. त्यापैकी १३.४९ टीएमसी इतका उपयुक्त साठा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी २५.१८ टक्के इतकी राहिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com